गोंडा, महाराष्ट्र: (Crime News) अलीकडील काळात सासू-जावयाच्या प्रेमसंबंधांची अनेक प्रकरणे समोर येत असताना, आता गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या विधवा चुलत सासूसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवून, आता तिच्यासोबत पळून गेला आहे. या प्रकरणामुळे पत्नी आणि तिची तीन लहान मुले न्यायासाठी संघर्ष करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवाबगंज भागातील पीडित महिलेचा निकाह १ नोव्हेंबर २०१७ रोजी बहराइच येथील इरफानसोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. लग्नानंतर हे दाम्पत्य रोजगाराच्या शोधात लखनऊला स्थलांतरित झाले आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. पती इरफान ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
COVID-19 Update: सध्या आढळणारा कोरोनाचा स्ट्रेन सौम्य, पुणे महापालिकेला एनआयव्हीची माहिती
पीडित महिलेने सांगितले की, तिची सख्खी मावशी गोंडा जिल्ह्यातील खरगपूर येथे राहते. २०१८ मध्ये तिच्या मावशीच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मावशीचे त्यांच्या लखनऊच्या घरी येणे-जाणे वाढले. सुरुवातीला तिला वाटले की, मावशी पतीच्या निधनामुळे दुःखी असल्याने आणि एकटेपणा जाणवत असल्याने त्यांच्याकडे येत असावी. मात्र, याच काळात पती इरफान आणि मावशी यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.
Municipal Elections : महापालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी, प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश
पीडितेच्या आरोपानुसार, गेल्या चार वर्षांपासून पती आणि मावशी यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी तिला याबद्दल समजल्यानंतर तिने याला विरोध केला. त्यानंतर तिचा पती आपल्या मावशी सासूसह फरार झाला. तिने लखनऊच्या ठाकूरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तसेच खरगपूर आणि धानेपूर येथेही तक्रारी नोंदवल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता पीडित महिलेने गोंडा येथील एसपी कार्यालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे. तिने पती आणि विधवा चुलत सासूविरोधात एफआयआर (FIR) नोंदवला आहे.