हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धी पत्रक

By: Editor _2

On: Tuesday, June 24, 2025 5:15 PM

Google News
Follow Us

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर वारीनिमित्त विविध उपक्रम ! 

पुणे – हिंदू जनजागृती समिती हि गेल्या वीस वर्ष्यापासून राष्ट आणि  कार्य करत असून त्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम संपूर्ण देशभरात नियमित राबवित असते. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी, मंदीर स्वच्छता, अन्नदान, शालेय साहित्य वाटप अश्या विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमही  नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून 21 जून या दिवशी पुणे शहरातील मंगळवार पेठ, पुणे येथे दु २ वाजता पंढरपूर कडे जाणाऱ्या वारीमधील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ‘हिंदू जनजागृती समिती’ न्यासाच्या वतीने 300 हून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक असलेलीऔषधेही मोफत देण्यात आली. काही जणांना पायाला झालेल्या जखमाना ड्रेसिंग करून औषधे देण्यात आली.ही तपासणी डॉक्टर प्रज्ञा सीडाम आणि डॉक्टर प्राजक्ता बनकर यांनी केली. 

    तसेच 22 जून या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर कडे जाणाऱ्या माऊलींच्या पालखीचे तेजोमय लॉन्स जवळ,वडकी नाला,पुणे येथे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.यासाठी या ठिकाणी मोठा बूथ उभारण्यात आला होता.यावेळी समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पू.गुरुराज श्री.देशमुख महाराज यांचेही सहकार्य लाभले.

  याबरोबरच वारीमध्ये ख्रिस्ती मिशनरी बायबलचे वाटप करून प्रचार करत असल्याचे लक्ष्यात आल्याने असा प्रचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निवेदन पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांना देण्यात आले. यावेळी आमदार विजयबापू शिवतारे यांनी तातडीने डिसीपी राजकुमार शिंदे यांना फोन करून एफ आय आर दाखल करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानकरी सुध्दा आवर्जून उपस्थित होते.अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी प्रसिद्धी पत्रकाचे माध्यमातून कळविली आहे. 

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026