Vicky Kaushal Birthday Special : ‘छावा’नंतर विकी कौशल एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला; रणबीर-आलिया सोबत झळकणार ‘या’ चित्रपटात

By: Editor_Pratik

On: Sunday, May 18, 2025 1:39 AM

Google News
Follow Us

Vicky Kaushal Birthday Special : ‘छावा’नंतर विकी कौशल एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला; रणबीर-आलिया सोबत झळकणार ‘या’ चित्रपटात

बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेता विकी कौशल आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. विकीचा जन्म १६ मे १९८८ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. अभिनयात पदार्पण करण्याआधी विकीने काही नामांकित चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे, ज्यामध्ये ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चे विशेष उल्लेख करता येईल.

‘मसान’पासून ‘छावा’पर्यंतचा यशस्वी प्रवास : विकीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘मसान’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातील त्याच्या नैसर्गिक अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही खूप कौतुक झाले. त्यानंतर त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘राझी’, ‘सरदार उधम’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘संजू’, ‘सॅम बहादुर’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘डंकी’, ‘बॅड न्यूज’ अशा विविध आणि दर्जेदार चित्रपटांतून आपली ओळख अधिक भक्कम केली.

‘छावा’ने गाजवले बॉक्स ऑफिस : त्याच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘छावा’, ज्यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींहून अधिक कमाई करत विकीच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला. या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी आणि दिग्गज कलाकारांनीही भरभरून दाद दिली.

लवकरच ‘लव्ह अँड वॉर’मध्ये महत्त्वाची भूमिका : ‘छावा’नंतर विकी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. तो लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात विकीच्या जोडीला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील प्रमुख भूमिकांमध्ये असणार आहेत. तीन मोठ्या कलाकारांची ही तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.

विकी लवकरच ‘तख्त’मध्येही दिसणार? : याशिवाय, विकी लवकरच करण जोहरच्या ‘तख्त’ या ऐतिहासिक चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026