Porsche Car Accident Case : ‘पोर्शे’ प्रकरणाबाबत मोठी घडामोड; पुणे पोलिसांनी…

By: Editor_Pratik

On: Sunday, May 18, 2025 8:21 AM

Porsche Car Accident Case
Google News
Follow Us

Porsche Car Accident Case : ‘पोर्शे’ प्रकरणाबाबत मोठी घडामोड; पुणे पोलिसांनी…

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठा पुढाकार झाला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा खटला लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र सादर केले आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असून, खटल्याची सुनावणी जलद गतीने पार पडावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे.

माहिती अशी की, या प्रकरणातील सर्व दहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, विशेष सरकारी वकिलांनी आरोप निश्चितीसाठी मसुदा न्यायालयात सादर केला आहे. मात्र बचाव पक्षाकडून जामीन व निर्दोष मुक्ततेसाठीचे काही अर्ज प्रलंबित असल्यामुळे खटल्याच्या पुढील टप्प्यास वेळ लागत आहे. आरोपी डॉक्टर अजय तावरे यांचा जामीन अर्ज 20 मे रोजी आणि आरोपी आदित्य सूद याची सुनावणी 19 मे रोजी होणार आहे. तर आरोपी शिवानी अग्रवाल यांना आधीच जामीन मंजूर झाला आहे.

Porsche Car Accident Case

याशिवाय, या प्रकरणात अल्पवयीन कारचालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणातही जलदगतीने कारवाई करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे वेगवान सुनावणीची मागणी केली आहे.

या अपघातात पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. यात दोन आयटी अभियंता, अनिश अवधिया (27) आणि अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकरण राज्यभरात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पुणे पोलिसांच्या जलदगतीने कारवाईसाठीच्या या प्रयत्नांमुळे खटला लवकरात लवकर न्यायालयात पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे न्यायप्रक्रियेतून लवकरच निष्पत्ती अपेक्षित आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now