Love Jihad : मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण; खोटे नाव सांगून युवतीची फसवणूक

By: Editor_Pratik

On: Thursday, May 15, 2025 8:50 AM

Google News
Follow Us

Love Jihad : मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण; खोटे नाव सांगून युवतीची फसवणूक

इंदूर (मध्य प्रदेश): राज्यात लव्ह जिहादच्या घटना सातत्याने उघड होत असताना, इंदूरमध्ये आणखी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. फैजान खान नावाच्या मुस्लिम युवकाने स्वत:ला ‘राहुल’ असे हिंदू नाव सांगून एका हिंदू मुलीशी नातं प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान खान याने २०१८ साली इन्स्टाग्रामवरून मूळ खांडव्याची असलेल्या पीडित तरुणीशी संपर्क साधला. त्याने ‘राहुल’ नावाने बनावट प्रोफाइल तयार करून तिच्याशी मैत्री केली. पुढे २०१९ मध्ये इंदूरमध्ये प्रत्यक्ष भेट झाली आणि दोघांत जवळीक वाढली.

२०२० मध्ये फैजानने पीडितेला बोलावून एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याने आपले खरे नाव फैजान खान असल्याचे उघड केले व पीडितेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकू लागला. त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणे सुरू केले.

७ मे रोजी फैजानने पुन्हा पीडितेला इंदूरला बोलावले आणि तिच्या धाकट्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने नातेवाइकांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर खजराणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी फैजानविरुद्ध मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा, बलात्कार, आणि धमकी देण्याचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now