Jyoti Malhotra : सर्वात मोठी कारवाई… हेरगिरी करणारी ज्योती ज्याच्या जीवावर उडायची, तेच पंख छाटले; ट्विस्ट काय?

By: Editor_Pratik

On: Monday, May 19, 2025 7:45 AM

Jyoti Malhotra Spy Case
Google News
Follow Us

Jyoti Malhotra Spy Case : पाकिस्तानी संपर्कांमुळे मोठी कारवाई, इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली असलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. Meta कंपनीने तिचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड केलं असून, लवकरच तिचं यूट्यूब चॅनल देखील बंद होण्याची शक्यता आहे.

ज्योतीवर आरोप आहे की, ती इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित एजंटांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस रील्स आणि ट्रॅव्हल कंटेंटमुळे प्रसिद्ध होती. तिच्या ‘Travel with Jo’ या यूट्यूब चॅनलला 3.77 लाख सबस्क्रायबर्स, तर इन्स्टाग्रामवर 1.32 लाख फॉलोअर्स होते.

2023 साली एका एजंटच्या मदतीने ज्योतीने पाकिस्तानचा व्हिसा घेतला होता. तिथे तिने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याची भेट घेतली होती. हा अधिकारी अलीकडेच भारतातून हद्दपार करण्यात आला आहे.

हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, ज्योतीला लष्करी गोपनीय माहितीचा थेट प्रवेश नव्हता, मात्र ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोकांच्या संपर्कात होती. काही इतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील या नेटवर्कमध्ये असल्याचा संशय आहे.

पोलिसांच्या मते, ही एक प्रकारची डिजिटल युद्धनीती आहे, जिथे शत्रुराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधी नॅरेटिव्ह पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now