Jyoti Malhotra Friend Inquiry : ज्योती मल्होत्राशी ओडिशाच्या यूट्यूबर तरुणीचं कनेक्शन? पाकिस्तानातही गेली होती सोबत! चौकशी सुरू

By: Editor_Pratik

On: Monday, May 19, 2025 6:22 AM

Jyoti Malhotra
Google News
Follow Us

Jyoti Malhotra Friend Inquiry : ज्योती मल्होत्राशी ओडिशाच्या यूट्यूबर तरुणीचं कनेक्शन? पाकिस्तानातही गेली होती सोबत! चौकशी सुरू

हरियाणाची प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अलीकडेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांमुळे अटक करण्यात आली असून तपास यंत्रणांनी तिची सखोल चौकशी सुरू केली आहे. ज्योतीवर आरोप आहे की तिनं पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी भारतातील संवेदनशील माहिती पुरवली.

या प्रकरणात आता ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील एका यूट्यूबर तरुणीचं नाव समोर आलं आहे. संबंधित यूट्यूबर ही ज्योती मल्होत्राची मैत्रीण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिचीही चौकशी करण्यात येत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सदर ओडिशा यूट्यूबरनं तीन ते चार महिन्यांपूर्वी ज्योतीसोबत पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉरला भेट दिली होती. या भेटीत त्या दोघींनी एकत्र प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघीही ट्रॅव्हलॉग बनवणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि विविध देशांत, शहरांत प्रवास करून त्याचे व्हिडीओ तयार करतात.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये पुरी येथे ज्योती मल्होत्रा आणि संबंधित यूट्यूबर यांच्यात प्रत्यक्ष भेट झाली होती. याच भेटीदरम्यान ज्योतीनं जगन्नाथ मंदिराचे काही फोटो घेतल्याचे सांगितले जात आहे. या फोटोंसह काही संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे.

सदर यूट्यूबर तरुणीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टपणे सांगितले आहे की, ती आणि ज्योती मल्होत्रा खरेच मैत्रिणी होत्या, परंतु तिच्या कोणत्याही हेरगिरी संदर्भातील क्रियाकलापांची आपल्याला कल्पनाही नव्हती. “जर मला याची माहिती असती, तर मी तिच्याशी मैत्रीही ठेवली नसती”, असं तिनं म्हटलं आहे.

सदर यूट्यूबरच्या वडिलांनीही माध्यमांशी बोलताना आपल्या मुलीचं नाव चुकीच्या प्रकारे या प्रकरणात ओढलं जात असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “माझी मुलगी घरीच होती आणि आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत. ती चार महिन्यांपूर्वी पहलगामला गेली होती. ज्योती तिथे होती की नाही, याची आम्हाला माहिती नाही.” त्यांनी असंही सांगितलं की, दिल्लीतल्या एका ट्रॅव्हल कंपनीनं तिच्या ट्रिपचं प्रायोजकत्व केलं होतं, आणि इतरही अनेक कंपन्यांनी तिला स्पॉन्सरशिप दिली आहे.

तत्पूर्वी, तपास यंत्रणा दोघींमधील संवाद, प्रवास, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी यांचे बारकाईने विश्लेषण करत आहेत. अद्याप ओडिशाच्या यूट्यूबरवर कोणताही ठोस आरोप सिद्ध झालेला नसून तिची चौकशी फक्त प्राथमिक टप्प्यावर आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026