नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी हॉटेलात घुसली; लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरवरील घटना; मद्यधुंद वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

By: Editor_Pratik

On: Sunday, May 11, 2025 4:34 AM

नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी हॉटेलात घुसली
Google News
Follow Us

नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी हॉटेलात घुसली; लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरवरील घटना; मद्यधुंद वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरवर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने हॉटेल असलेल्या इमारतीत कार घुसली. यात वाहनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. या धडकेत एका दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मीपुरी येथील एका हॉटेलच्या समोर आंबे विक्रेते बसले होते. ते रात्री आपला व्यवसाय बंद करून गेले होते. त्यावेळी फोर्ड कॉर्नर सिग्नलजवळून वेगाने आलेल्या कारचालकाचा ताबा सुटल्याने आंबे विक्री करणार्‍या शेडमधून तो हॉटेल असलेल्या इमारतीत घुसला. जोराच्या धडकेत त्या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली.

चारचाकीचा पुढील दर्शनी भाग इमारतीत घुसला. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी वाहनातून चालकाला बाहेर काढले. वाहनचालक राजारामपुरी 14 वी गल्ली येथे राहत असल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यांनी बघ्यांच्या गर्दीला पांगवले व कारचालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविले. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026