BIG NEWS : पंतप्रधानाच्या घराशेजारी ड्रोन हल्ला, इंगा दाखवला

By: Editor_Pratik

On: Friday, May 9, 2025 4:50 AM

Google News
Follow Us

BIG NEWS : पंतप्रधानाच्या घराशेजारी ड्रोन हल्ला, इंगा दाखवला

नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी दिवसभर केलेल्या आगळीकीनंतर भारताने आक्रमक पवित्रा स्वीकारत थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केल्यानंतर आता थेट पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ याच्या घराच्या परिसरात भारताने ड्रोन हल्ला केला आहे.

भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान प्रचंड घाबरलेला आहे. गुरुवारी दिवसभर पाकिस्तानच्या माऱ्याला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांचे प्रत्येक ड्रोन नेस्तनाबूत केले. भारताच्या आक्रमक कारवाईसमोर पाकिस्तानचा अजिबातच टिकाव लागला नाही. त्यामुळे अखेर गुरुवारी रात्री लष्करप्रमुख मुनीर याला ताब्यात घेऊन त्याला पदावरून हटविण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट केले आहे.

लाहोर, इस्लामाबाद, कराची, पेशावर, सियालकोट अशा पाकिस्तानातील प्रमुख शहरांत भारतीय लष्कराने ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानने जशी सीमेवर आगळीक केली तशी भारताने आक्रमक पावले उचलून ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तानला अगदी घायाळ करून सोडले. स्फोटांच्या आवाजांनी आणि झालेल्या नुकसानीने पाकिस्तानी सैरावैरा धावत सुटले.

पाकिस्तानने भारतातील प्रमुख १५ शहरांवर हल्ला करण्याचे नियोजन आखले होते. यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी आणि भुज यांचा समावेश होता. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यांना भारताने काउंटर यूएएस आणि हवाई संरक्षण प्रणालींच्या मदतीने प्रत्युत्तर देऊन हे हल्ले निष्क्रिय केले. हल्ले निष्क्रिय केल्यानंतर त्याचे क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे अवशेष सापडले.

नियंत्रण रेषेवर असलेल्या जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोर्टार शेल डागण्यात येत आहेत. ज्यामध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला आणि पाच मुलांचा समावेश आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले, त्यानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026

April 22, 2026