लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणली आणखी एक मोफत योजना, ९० टक्के अनुदानावर…

By: Editor_Pratik

On: Thursday, May 22, 2025 11:15 AM

Google News
Follow Us

लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणली आणखी एक मोफत योजना, ९० टक्के अनुदानावर…

नागपूर – ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारकडून महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक नवा पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यात गरीब व गरजू महिलांसाठी ९०% अनुदानावर मोफत पिठाची गिरणी देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून उत्पन्न मिळवणं. त्यामुळे त्या घरखर्चात हातभार लावू शकतील आणि कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावं लागणार नाही.

माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेचा खळबळजनक खुलासा


काय आहे ही योजना?

या योजनेत सरकार गिरणीच्या एकूण किमतीपैकी ९० टक्के रक्कम अनुदान म्हणून देते. उदा. गिरणीची किंमत १०,००० रुपये असल्यास, त्यातील ९,००० रुपये सरकारकडून दिले जातात आणि अर्जदार महिलेला फक्त १,००० रुपये भरावे लागतात.


योजनेच्या मुख्य अटी व पात्रता:

✅ अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी

✅ अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये यावी

✅ वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे

✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१.२० लाखांपेक्षा कमी असावे

✅ ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य


अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड

  • जात प्रमाणपत्र

  • उत्पन्नाचा दाखला

  • रेशन कार्ड

  • रहिवासी प्रमाणपत्र

  • बँक पासबुक

  • गिरणी खरेदीसाठी कोटेशन


या योजनेचे फायदे काय?

गिरणी मिळाल्यानंतर महिला आपल्या घराजवळ पिठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. गावांमध्ये अशा सेवा मर्यादित असतात, त्यामुळे अनेक घरांमधून पीठ दळण्यासाठी ग्राहक सहज मिळतात. यामुळे महिला रोजचं उत्पन्न मिळवू शकतात आणि पुढे हाच व्यवसाय वाढवून मोठ्या प्रमाणात पीठ विक्रीही करू शकतात.


महत्वाची सूचना:

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर ही सुवर्णसंधी नक्की दवडू नका. वेळेत अर्ज करा, सरकारकडून मदत घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बना!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026