शिकार प्रकरणी २१ आरोपी जुन्नर वनविभागाच्या ताब्यात

By: Editor_Pratik

On: Friday, May 16, 2025 4:42 AM

Google News
Follow Us

शिकार प्रकरणी २१ आरोपी जुन्नर वनविभागाच्या ताब्यात

जुन्नर तालुका : जुन्नर येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २१ जणांना जुन्नर वनविभागाच्या पथकाने पकडले असून, त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मंगळवार दि. १३ मे रोजी जुन्नर तालुक्यातील वनकक्ष क्र. १३७ मध्ये २० ते २५ जण वाघुरींच्या मदतीने शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती राजूरचे वनरक्षक एकनाथ बांगर यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ वनरक्षक निमगिरी व आपटाळे यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम वन्यप्राण्यांना हुसकावत असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी अधिक मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली व सदर ठिकाणी शिकारसाठी आणलेल्या २१ वाघुरी व १० दुचाकी वाहने जप्त केली.

धाडीत सुराळे येथील १५, हडसर येथील ४ तसेच तेजूर व मांगणेवाडी (खामगाव) येथील प्रत्येकी १ अशा एकूण २१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी सुराळे येथील निलेश केदारी, रमेश केदारी, प्रदीप केदारी आणि हडसरचा किसन भले हे चौकशीस सहकार्य करत नसल्याने व दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सरकारी वतीने युक्तिवाद करताच न्यायालयाने चारही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित १७ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना बंधपत्रावर मुक्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Deshseva Foundation

September 3, 2026

Deshseva Foundation

September 3, 2026

September 2, 2026

September 1, 2026

August 27, 2026

August 25, 2026