‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप !

By: Editor _2

On: Sunday, May 18, 2025 2:32 PM

Google News
Follow Us

गोवा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘ रामराज्य संकल्प जपयज्ञा’ मध्ये पुणे जिल्ह्यातील २००० हून अधिक साधक,धर्मप्रेमी यांचा सहभाग!

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – भारतात ‘रामराज्य’ हे केवळ एक धार्मिक आदर्श नव्हे, तर संस्कृती, नीती, आणि न्यायाधिष्ठित शासन व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. या महान उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप गोवा येथे सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात करण्यात आला. ‘देशविदेशातून आलेल्या २५ सहस्रपेक्षा अधिक भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप केला. या जपयज्ञामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते.

यावेळी पुणे जिल्ह्यातील 2000 हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. राष्ट्राला अध्यात्मिक उर्जा देणे, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे आणि सनातन हिंदू संस्कृतीचा जागर घडवणे हा या जपयज्ञाचा उद्देश आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now