UPI चं नवं ‘सर्कल’ फीचर: आता बायकोसुद्धा करू शकेल तुमच्या खात्यातून थेट पेमेंट!
UPI व्यवहारांनी सध्या रोजचं जीवन अधिक सुलभ आणि डिजिटल बनवलं आहे. बाजारहाट असो किंवा रिचार्ज – बहुतेक व्यवहार आता UPI द्वारे सहज पार पडतात. याच डिजिटल प्रवासात PhonePe ने एक नवं आणि उपयुक्त फीचर सादर केलं आहे – ‘UPI Circle’.
या नव्या फीचरद्वारे आता वापरकर्ता आपल्या UPI खात्यातून कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकतो, आणि विशेष बाब म्हणजे – त्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर बँक खाते असण्याची गरज नाही!
कसं काम करतं हे फीचर?
मानूया, तुमची पत्नी बाजारात गेली आहे, पण तिच्याकडे UPI पेमेंट करण्यासाठी पैसे नाहीत. अशावेळी, तुमच्या खात्यातून थेट पेमेंट तिच्या मोबाईलवरून करता येईल. हे शक्य होणार आहे ‘UPI Circle’च्या माध्यमातून.
फीचरचे ठळक मुद्दे:
- सेकेंडरी युजरला दरमहा ₹15,000 आणि प्रत्येक व्यवहारासाठी ₹5,000 पर्यंत पेमेंट करता येणार.
- दोन डेलिगेशन मोड:
- Auto Approval – प्रत्येक व्यवहारासाठी प्राथमिक युजरची परवानगी नको.
- Manual Approval – प्रत्येक व्यवहारासाठी परवानगी आवश्यक.
- प्राथमिक युजर जास्तीत जास्त ५ सेकेंडरी युजर्स जोडू शकतो.
- प्रत्येक व्यवहाराची माहिती प्राथमिक युजरला मिळेल.
हे फीचर कसं ऍक्टिवेट कराल?
- PhonePe अॅप उघडा.
- ‘UPI Circle’ वर क्लिक करा.
- सेकेंडरी युजरचा UPI ID टाका किंवा QR कोड स्कॅन करा.
- डेलिगेशन प्रकार निवडा आणि रिक्वेस्ट पाठवा.
- सेकेंडरी युजरने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर फीचर ऍक्टिवेट होईल.
- प्रत्येक व्यवहारासाठी बायोमेट्रिक किंवा पासकोडद्वारे ऑथेंटिकेशन आवश्यक.
- या फीचरमुळे कुटुंबातील सदस्य एकाच खात्याचा वापर करून सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील आणि व्यवहाराचा पूर्ण ट्रॅकही राहील.
UPI च्या दुनियेत हे एक नवं आणि क्रांतिकारी पाऊल आहे!