मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद…

मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद…

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. महिलेने आपल्या प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नाही तर तिच्या नवऱ्याचा भाचा होता. पती आपले प्रेमसंबंध संपवेल या भितीने तिने पतीची हत्या केली. उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून कुटुंबीयच हत्येत सहभागी असल्याच्या घटना समोर येत आहेत. देवरिया हत्याकांड मेरठमधील हत्येच्या फक्त एक महिन्यानंतर घडले आहे, ज्यामध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये ठेवले.

रविवारी देवरियाच्या पकारी छपर पटखौली गावात काही लोकांना शेतात एक ट्रॉली सुटकेस दिसली होती. संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यांना त्यात एक मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला बोलावण्यात आलं.

Motorola Edge 60 : 50MPच्या सेल्फी कॅमेऱ्यासह दणकट फोन; Motorola Edge 60 चे स्पेसिफिकेशन…

पोलिसांना सुटकेसवर एक सुगावा सापडला होता. त्यावर पत्ता लिहिलेला होता. पुढील तपासात, त्यांना मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश मिळालं. मृत व्यक्तीचं नाव नौशाद (30) असल्याचं त्यांना समजलं. तो आखाती देशात काम करत होता आणि गेल्या आठवड्यातच घरी आला होता असं पोलिसांना समजलं.

काळ्या काचा आणि ‘व्हीआयपी नंबर प्लेट्स’ना अटकाव; जिल्ह्यात मोठी कारवाई; वाहतूक शिस्तीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज; नियमबाह्य गाड्या थेट जप्त करण्याचे आदेश

पोलिसांनी नौशादची पत्नी रझिया सुलताना (30) हिची चौकशी केली असता तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. भाचा रोमन (27) सोबतच्या प्रेमसंबंधात अडथळा आणत असल्याने त्याची हत्या केल्याचं तिने सांगितलं. तिने पोलिसांना सांगितलं की, नौशादची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली. यामध्ये ती, रोमन आणि त्याचा मित्र हिमांशू हत्येत सहभागी आहेत. रोमन आणि हिमांशूने नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि त्यांच्या घरापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या शेतात फेकून दिला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यारदेखील जप्त केले आहे. रोमन आणि हिमांशू फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नौशादची बहीण निशाने सांगितलं आहे की, त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत होतं आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून मध्य पूर्वेत काम करत होता. त्याने घरही बांधलं ज्यामध्ये त्याचे वृद्ध वडील, पत्नी रजिया आणि मुलगी राहते. तो एका आठवड्यापूर्वी दोन सुटकेस घेऊन परतला होता. त्यातील एक सुटकेस त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरली जाईल याची त्याला साधी कल्पनाही नव्हती.

deoria-murder-aunt

“माझ्या मेव्हणीचे आमच्या भाच्याशी प्रेमसंबंध होते. त्यांनी माझ्या भावाची हत्या केली, त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आणि शेतात फेकून दिला. आमच्या भाच्याने त्याच्या मामाला त्याच्या मामीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे मारले. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या आहेत.

मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद…

देवरिया पोलिस प्रमुख विक्रांत वीर म्हणाले की, मृतदेह सापडल्यानंतर नौशादच्या मेव्हणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही त्याच्या पत्नीची चौकशी केली आणि तिने हत्येत सहभाग असल्याचं कबूल केलं. तिने सांगितलं की तिच्या पतीचा भाचा रोमन आणि त्याचा मित्र हिमांशू या हत्येत सहभागी होते. शनिवारी रात्री उशिरा ही हत्या झाली. रोमन आणि हिमांशू ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी त्या रात्री एक एसयूव्ही आणली आणि हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“आम्ही मुख्य आरोपी रझिया सुलतानाला अटक केली आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्यांना अटक करू,” असं अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी असेही सांगितले की नौशादला त्याचा भाचा रोमन आवडत नव्हता आणि यावरून या जोडप्याचे भांडण होते.

पोलिसांनी पीडितची ओळख कशी पटवली असं विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितलं की, “मृत व्यक्तीने ती ट्रॉली वापरली होती, त्यामुळे त्यावर त्याचा पत्ता होता. अशा प्रकारे आम्ही त्याची ओळख पटवली. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि चौकशीदरम्यान मुख्य आरोपीने कबुली दिली”.