Pune Crime : सिंहगड कॉलेज परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड; सहा जण अटकेत

Pune Crime : सिंहगड कॉलेज परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड; सहा जण अटकेत

पुणे – सिंहगड कॉलेज परिसरात लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी कठोर कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून, ज्या भागात त्यांनी दहशत निर्माण केली, तिथेच त्यांची धिंड काढून जनतेसमोर त्यांचा माज उतरवण्यात आला.

Youtuber Wife Kills Husband : युट्यूबर पत्नीचे घरातच सुरू होते प्रियकराबरोबर संबंध, पतीनं पाहताच झाला वाद; दोघांनीही कट रचून पतीला संपवलं

पोलिसांनी सुरू केलेल्या ‘धिंड पॅटर्न’अंतर्गत आरोपींना गुडघ्यावर बसवत कारवाई केली गेली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपींनी कोयता व लोखंडी हत्यारे हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली होती. गाड्यांची तोडफोडदेखील करण्यात आली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

WhatsApp : आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?

ही कारवाई पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील व सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, निरीक्षक राहुल खिलारे, समीर कदम, निलेश मोकाशी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

मुलीशी का बोलतो म्हणून मुलावर कोयत्याने वार; प्रकृती गंभीर, क्रिकेट मॅच पाहताना झाली ओळख

आरोपींच्या दहशतीमुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या टोळ्यांना धडा शिकवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. भविष्यात कोणीही अशा प्रकारची दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

‘लाडक्या बहि‍णींना’ १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार?

Pune Businessman Murder : पुण्याच्या व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या, विमानाने पाटण्यात गेले ते परत आलेच नाहीत