Crime : महाविद्यालयीन युवतीचा खून; एक संशयित ताब्यात; नातेवाईकांनी फोडला हंबरडा

Crime : महाविद्यालयीन युवतीचा खून; एक संशयित ताब्यात; नातेवाईकांनी फोडला हंबरडा

चाकण :  खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत मिळून आला आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा

अपेक्षा वसंत मांजरे (वय – १७, रा. मांजरेवाडी, धर्म, ता. खेड ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेबाबत खेड पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी अपेक्षा ही राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. राजगुरुनगर येथे शुक्रवारी (दि. ११) ती नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती. मात्र पुन्हा ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील नातेवाईकांनी अपेक्षा बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसात दिली होती. शनिवारी ( दि. १२ ) दुपारी भीमा नदीकाठी तिचा मृतदेह आढळून आला. सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली.

पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणीचा खून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले.

“रविवारी पिडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साक्षी गंधाचा सोहळा होणार होता. या घटनेमुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे नातेवाईकांनी अक्षरशा हंबरडा फोडला. कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.”