‘गझवा-ए-हिंद’ की ‘सनातन राष्ट्र’?
प्रस्तावना – भारत आज विकासाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आणि जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, त्याच वेळी एक अंतर्गत धोका दिवसेंदिवस गडद होत आहे तो म्हणजे ‘गझवा-ए-हिंद’चा धोका ! ‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतात जिहादी राष्ट्र स्थापनेच्या दिशेने उचललेली कट्टरपंथीय पावले ! ही फक्त विचार, कल्पना नाही, तर प्रत्यक्षात अमलात आणण्याचे कट रचले जात आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद हे याच ‘गझवा-ए-हिंद’चे छोटे रूप आहे. आयसिस (ISIS), अल कायदा, अन्सार-उल-इस्लाम, पीएफआय यांसारख्या संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये विष पेरत आहेत. त्यांचे स्थानिक समर्थन करणारे ‘स्लीपर सेल्स’ भारतात हळूहळू पाळेमुळे रोवू पाहत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांनुसार, भारतातील अनेक ठिकाणी, विशेषतः केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये इसिसशी संबंधित आतंकवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. शिक्षित तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या विचारसरणीचा वापर करून त्यांना जिहादच्या मार्गावर नेले जात आहे. यामागे केवळ हिंसाचार नाही, तर भारतात ‘खिलाफत’ प्रस्थापित करण्याचा दुष्ट हेतू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे आपण निधर्मी राष्ट्रात सुरक्षित आहोत का? त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पावलांवर पाऊल ठेवून, आता भारताला पुन्हा एकदा सनातन राष्ट्र, हिंदु राष्ट्र, रामराज्य बनवण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. कारण ही हिंदूंच्या अस्तित्वाची, सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाची लढाई आहे. ‘गझवा-ए-हिंद’ला ‘सनातन राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे’, हे हिंदूंच्या मनावर अंकित करावे लागेल.
आतंकवादाला धर्म असतो याची प्रचिती !
नुकताच पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कलम ३७० हटवल्या नंतरही दहशतवादी हल्ले चालूच आहेत. आज पुन्हा काश्मिर मध्ये हिंदु मारले गेले, जात विचारली नाही फक्त हिंदू आहेत का? एवढेच विचारले ! २६ हिंदुनी आपल्या प्राणांचे मोल देऊन आतंकवादाला धर्म असतो हे सिद्ध केले आहे. मुंबईमध्ये १९९२-९३ च्या दंगलीदरम्यान ‘राधाबाई चाळ’ या घटनेने शहराला हादरवून टाकले होते. ही चाळ मुंबईतील जोगेश्वरी भागात आहे. १९९३ च्या जानेवारी महिन्यात, या चाळीत ६ हिंदू नागरिकांना जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेमध्ये हल्लेखोरांनी धर्म ओळखूनच हिंदुना लक्ष्य केले होते. अशा अनेक घटना हिंदूंवर विशिष्ट धर्माने केलेल्या अत्याचाराच्या साक्षी आहेत. आज पहलगाममध्ये जे घडलं, तेच मुर्शिदाबादमध्ये घडत आहे; सनातनी क्षेत्रांवर, सण-उत्सवांवर, मंदिरांवर, महिलांवर आणि संपूर्ण हिंदू समाजावर, तसेच संपूर्ण जगभरात अशाच प्रकारे हिंसा आणि नरसंहार चालू आहेत. पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या आतंकवादी संघटनेने स्वाकारले आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला गझवा-ए-हिंद बनवण्याचे मोठे षड्यंत्र ‘आय.एस्.आय.’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांनी रचल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनेउघड केले आहे
.
आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे
इसीस, पीआयएफ आणि अफगाणिस्तानमधील ISIS-K यांनी भारताला गझवा-ए-हिंद बनवण्याचे षड्यंत्र रचले आहे. ISIS-K काश्मीरमध्ये ‘स्लीपर सेल्स’ म्हणून सक्रिय आहे, तसेच सोशल मीडिया प्रपोगंडाद्वारे भारतातील तरुणांना या संघटनांमध्ये भरती करत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक कट्टरवादी गटांशी संबंधित असलेल्या ‘स्लीपर सेल्स’ चा धोका आहे. यामुळे भारताला या धार्मिक कट्टरतेपासून मुक्त करण्यासाठी सनातन राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे.
इस्लामिक स्टेटची छुपी रणनीती !
इस्लामिक स्टेट (ISIS) ही आतंकवादी संघटना इराक-सिरीयात अत्यंत क्रूर कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. १९९० मध्येच काश्मीरमध्ये “निझाम-ए-मुस्तफा” म्हणजेच इस्लामिक स्टेटची सुरुवात झाली होती. आजही ISIS चा धोका कायम आहे – २०२४ मध्ये मॉस्कोमध्ये आणि २०२५ मध्ये न्यू ऑर्लिन्समध्ये प्रेरित हल्ले झाले. जरी त्यांचे भौगोलिक नियंत्रण संपले असले तरी, त्यांच्या गुप्त सेल्स, विचारधारा आणि प्रेरणेतून होणारे हल्ले हे जागतिक सुरक्षेसाठी आणि भारतातील सामाजिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. त्यांनी आपली रणनिती बदली आहे थेट युद्धाऐवजी छुपा घात,विचारधारात्मक प्रचार, आणि स्थानिक गटांना प्रेरणा देणं हे आता त्यांच्या कारवायांचे केंद्रबिंदू आहे.
हिंदू सुरक्षित आहेत का ?
इसिस व्यतिरिक्त भारतासाठी धोका ठरू शकणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, इंडियन मुजाहिदीन,अल-कायदा इन इंडियन सबकॉंटिनंट, स्थानिक इस्लामी कट्टर गट (केरळ, बंगाल, तामिळनाडूतील), स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या ८ प्रमुख दहशतवादी संघटना तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षा आणि कायदा-व्यवस्थेला धोका आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या ही देश आणि हिंदु धर्म यांसाठी धोक्याची घंटा आहे. या व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात हिंदूंना आत्मपरीक्षण करायला लावणार्या अनेक घटना घडल्या. मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांधांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. अनेक हिंदूंची घरे, दुकाने लुटण्यात आली आणि त्यांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे घाबरलेल्या ४०० हून अधिक हिंदूंनी तेथून पलायन केले आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात मुर्शिदाबाद, मालदा, नाडिया, दक्षिण २४ परगणा हे ४ जिल्हे अशांत झालेले आहेत. बंगाल, बिहार, तसेच महाराष्ट्र राज्यांत धर्मांधांनी घडवून आणलेला हिंसाचार आता हळूहळू भारतातील इतर राज्यांमध्येही पसरत आहे. देशातील जिहादी गट, स्लीपर सेल्स आणि त्यांना समर्थन देणारे धर्मांध भारतासाठी मोठे आव्हान आहेत.
सनातन राष्ट्रच सर्वांचे रक्षण करू शकते !
हजारो वर्षांपासून कट्टरपंथीय भगव्या भारताला हिरवे बनण्याची वाटच पहात आहेत. पूर्वीच्या काळातील जिहादी आक्रमकांनी केवळ भारतातील संपत्ती लुटली नाही, तर या भूमीतून हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि हिंदू यांना नष्ट करून या देशावर हिरवा झेंडा फडकावण्याचे स्वप्न बाळगले. त्या काळी हिंदूंनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आता हेच स्वप्न बाळगून जगभरातील जिहादी, आतंकवादी आणि धर्मांध भारताला अन् हिंदूंना लक्ष्य करत आहेत. पलायन आता आपली, हिंदूंची, प्रवृत्ती बनली आहे कारण आपण हिंदूंनी ठरवून टाकलं आहे की इतिहासापासून काही शिकायचेच नाही. आज देशासमोर असलेले जिहादी आतंकवादाचे इसिससारखे संकट आणि त्यांचे पाठीराखे पहाता, पुढे निधर्मी राष्ट्र कि सनातन राष्ट्र हा प्रश्न निर्माण होणार नाही, तर सनातन राष्ट्र कि इस्लामिक स्टेट असा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा वेळी निधर्मीवाद्यांना धर्म वा अधर्म यांची बाजू घ्यावीच लागेल. त्यावेळेस केवळ सनातन राष्ट्रच सर्वांचे रक्षण करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ इस्लामी सत्तांना धूळ चारून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या देशावर धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे राज्य आल्यानेच आपला देव, धर्म, संस्कृती, इतिहास, भाषा, आबालवृद्ध आणि स्त्रिया यांचे खर्या अर्थाने रक्षण अन् पालन होते. आपले राज्य झाले, आपल्या हाती सत्ता आली, तरच स्वधर्माचे रक्षण आणि संवर्धन करता येते, हे अनुभवसिद्ध सत्य शिवाजी महाराजांनी ओळखले होते. धर्माचरणी आणि सत्त्वगुणप्रधान लोकप्रतिनिधी अन् त्यांचे सेवक धर्माधिष्ठित म्हणजेच आदर्श, सर्व गुणांनी युक्त अशी आदर्श व्यवस्था निर्माण करू शकतात. हेच धर्माचरणी लोकप्रतिनिधींचे धर्माचरणी प्रजेचे धर्मनिष्ठ सनातन राष्ट्र असेल ! भव्य, व्यापक आणि तेजःपुंज असणार्या सनातन राष्ट्रापुढे ‘गझवा-ए-हिंद’चा टिकाव पण लागणार नाही.
अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे रामराज्याचा अर्थात् भावी सनातन राष्ट्राचा प्रारंभ !
पृथ्वीवर शांततामय जीवन जगायचे असेल, तर हिंसाचाराची नव्हे, तर सहिष्णुतेची आवश्यकता आहे. सनातन हिंदु धर्म सहिष्णुतेसारख्या उच्चतम मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देतो. त्यामुळे तो जगासाठी कल्याणकारी आहे. हिंदु धर्माधारित राज्यप्रणाली जगभरातील राष्ट्रांनी आचरणात आणल्यास हिंसाचारी प्रवृत्तीचा लोप होईल. भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ होण्यापूर्वी हिंदूंनी ‘सनातन राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हावे ! हिंदूंच्या मनात आणि हृदयात ‘सनातन’चा झेंडा रोवणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले हे समाजाला लोककल्याणकारी सनातन राष्ट्राकडे घेऊन जात आहेत. अयोध्येत प्रतिष्ठापित होऊन प्रभु श्रीरामांनी एक प्रकारे आपल्या रामराज्य म्हणजेच सनातन राष्ट्र स्थापनेच्या अभियानाला अधिष्ठानच दिले आहे. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सूक्ष्मातून रामराज्याचा अर्थात् भावी सनातन राष्ट्राचा प्रारंभ झाला आहे.
‘गझवा-ए-हिंद’सारख्या विचारांच्या विरोधात आपल्याला धर्माभिमान, एकजूट आणि सनातन मूल्यांची मशाल हाती घ्यावी लागेल. ‘गझवा-ए-हिंद’सारख्या विघातक प्रवृत्तींना संपवायचे असेल, तर समाजहित, न्याय आणि धर्मनिष्ठतेवर आधारलेले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यसंकल्पनेपासून प्रेरणा घेतलेले ‘सनातन राष्ट्र’च निर्माण करावे लागेल. त्यासाठी आपण एकत्र येऊन ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी कटिबद्ध होऊया !
संकलक : श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था