महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाला बळकटी देणारे पाऊल
भारतातील आघाडीचा व्यावसायिक समूह आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची पालक कंपनी असलेल्या मलाबार समूहाने पुणेस्थित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल कॅम्प येथे ४५४ पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करून तरुणींना शिक्षणाद्वारे सक्षमता मिळवून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्तता केली. या विद्यार्थिनींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एकूण ४०,९२,००० रुपयांचे शिष्यवृत्ती स्वरूपात याप्रसंगी वाटप करण्यात आले. ज्यामुळे या विद्यार्थिनींना कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा व स्वप्ने पूर्ण करता येतील.
पुण्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. हारुन अत्तार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली त्यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे झोनल प्रमुख पी.टी. अन्वर यांच्यासह अन्य मान्यवर ही उपस्थित होते.
पुण्यातील या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमातून संपूर्ण भारतात शिक्षण आणि कौशल्य विकासाला पाठिंबा देण्याच्या या समूहाच्या व्यापक प्रयासांना ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे. शाश्वत उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या मलाबार समूहाच्या व्यापक ध्येयामुळे भविष्यातील पिढ्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि सर्वांसाठी समावेशक, शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी समूह वचनबद्ध राहिला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले, “शिक्षणाद्वारे प्रगतीचा पाया रचला जातो आणि तरुणींना ज्ञानाने सुसज्ज करणे हा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या शिष्यवृत्ती केवळ या मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी नसून, तर ही आपल्या समाजाच्या भविष्यातील गुंतवणूक देखील आहे. ज्यामुळे या तरुणींच्या प्रतिभेची पूर्णत्वाने भरारी आणि त्यांच्या यशाच्या पूर्ततेत भर घातली जाण्यासह, कोणत्याही आर्थिक अडचणींची त्यात बाधा येणार नाही याची खात्री केली गेली आहे.”
समूहाच्या सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत, मलाबार स्कॉलरशिप प्रोग्राम हा एक प्रमुख उपक्रम असून, उपेक्षित समुदायांमधील होतकरूंसाठी शैक्षणिक अंतर भरून काढण्यास तो मदतकारक ठरला आहे. तरुण मुलींसाठी शैक्षणिक संधी वाढवून, मलाबार समूहाचे उद्दिष्ट हे असे दूरगामी परिवर्तन घडवून आणणे आहे, जे व्यक्तींपेक्षा कुटुंबे आणि संपूर्ण समुदायांपर्यंत विस्तारणारा प्रभाव साधेल.
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झाल्यापासून, मलाबार चॅरिटेबल ट्रस्ट अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. मलाबार समूह आपल्या वार्षिक नफ्यातील ५ टक्के हिस्सा सीएसआर उपक्रमांना समर्पित करतो, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरणीय शाश्वतता आणि दारिद्र्य निर्मूलन यावर लक्ष केंद्रित केले जाते.