भारतीय मेन्सवेअर ब्रँड ‘तस्वा ‘चे मुख्य स्टोअर पुण्यात सुरू बॉलिवूड अभिनेता विजय वर्माच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन

आधुनिक भारतीय पुरुषांसाठी विवाहप्रसंगाच्या पोशाखांचा ब्रँड असलेल्या ‘तस्वा ‘ने पुण्याच्या मध्यभागी आपले शानदार फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले आहे. प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी यांच्या सहकार्याने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल) ने हा ब्रँड लाँच केला आहे. हे नवीन स्टोअर नावाजलेल्या वासुपूज्य स्वामी महाराज मंदिराजवळ, ६५८ साचापीर स्ट्रीट, एमजी रोड, कॅम्प, पुणे – ४११००१ येथे २४०० चौरस फुटात पसरले असून कलाकुसरीने तयार केलेल्या कपड्यांद्वारे आणि खरेदीच्या अनोख्या अनुभवाद्वारे लक्झरी आणि सुंदरता प्रदान करण्याच्या ‘तस्व’च्या कटिबद्धतेला ते बळकटी देते. अधिक माहिती www.tasva.com वर उपलब्ध आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा आणि तस्वाचे ब्रँड हेड श्री. आशिष मुकुल उपस्थित होते. पुण्यातील हे स्टोअर केवळ रिटेल स्पेस पेक्षाही अधिक अनुभव प्रदान करते. भारतातील बहुसांस्कृतिक पुरुषांच्या विकसित होत असलेल्या अभिरुचीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने त्याचे डिझाईन केलेले आहे. वारशाची प्रेरणा असलेली सौंदर्यात्मकता आणि समकालीन कौशल्याचे मिश्रण असलेल्या या स्टोअरमध्ये आधुनिक भारतीय पुरुषांच्या कपड्यांना नवा अर्थ देण्याच्या तस्वाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिब पडले आहे.

या स्टोअरमध्ये तस्वाचे उत्सवी कलेक्शन असून त्यामध्ये आकर्षक कुर्ता सेट आणि बुंदी हे प्रमुख आहेत. यात आकर्षक स्क्रीन प्रिंट्स आणि आधुनिक सिल्हाऊट्स असून ती पारंपारिक पोशाखाला नवीन वळण देतात. दरम्यान, वेडिंग कलेक्शनमध्ये आलिशान शेरवानी, अचकन, इंडो-वेस्टर्न आणि बंद गळे असून ते उंची कापडांपासून बनवलेले आहेत आणि बारीक भरतकामाने सजवलेले आहेत.

“पुण्यातील आमच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये शैली, परंपरा आणि कारागिरीचा मिलाफ या ‘तस्वा ‘च्या मूळ तत्त्वाचे मूर्त स्वरूप आम्हाला हवे होते,” असे ‘तस्वा ‘चे ब्रँड हेड आशिष मुकुल म्हणाले. “स्टोअरच्या डिझाईनपासून ते लेआउटपर्यंत प्रत्येक तपशील काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे जेणेकरून सहज आणि एकरूप खरेदीची यात्रा तयार होईल. त्यातून आमच्या ग्राहकांना ‘तस्व’चा एक अनोखा अनुभव मिळेल.”अत्यंत प्रशिक्षित स्टायलिस्टकडून मिळणारा वैयक्तिक सल्ला आणि मदतीमुळे पुण्यातील स्टोअरमध्ये अतुलनीय खरेदीच्या अनुभवाची खात्री मिळते.

‘तस्वा ‘च्या पाठीमागील सर्जनशील शक्ती असलेले प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी लाँचबद्दल विचार मांडताना म्हणाले, “’ तस्वा ‘मध्ये आम्ही भारतीय पुरुषांच्या कपड्यांना नवी कल्पना दिली आहे. त्यामध्ये पाश्चात्य टेलरिंगच्या अचूकतेला टक्कर देणारे उत्कृष्ट फिटिंग असून पारंपारिक पोशाखाशी तिचा सहज मिलाफ साधला आहे. प्रत्येक वस्त्र काटेकोरपणे तयार केले असून त्यामुळे सहज हालचाल आणि आरामाची निश्चिती होते आणि तीक्ष्ण, परिशुद्ध आकृती मिळते. भारतीय पोशाखांचा भव्यतेशी दीर्घकाळापासून संबंध आहे, परंतु त्यातून निखळ सहजता मिळायला हवी, जेणेकरून पुरुष त्यांचे खास क्षण आत्मविश्वासाने आणि भव्यतेने साजरे करू शकतील यावर आमचा विश्वास आहे. पुण्याने उत्कृष्ट कारागिरीला नेहमीच दाद दिली आहे आणि ‘ तस्वा ‘ची सिग्नेचर अत्याधुनिकता शहरात घेऊन येताना आम्ही रोमांचित आहोत.”

या लाँचबद्दल उत्साह व्यक्त करताना बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा म्हणाले, “मी पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून दोन विलक्षण वर्षे घालवली आहेत. या लाँचसाठी येथे आल्यावर एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आहे.” ‘तस्वा ‘शी आपला वैयक्तिक अनुभव शेअर करताना तो पुढे म्हणाला, “मी अनेक वेळा ‘तस्वा’ परिधान केला आहे. सुंदरतेशी तडजोड न करता हे कपडे किती सहजतेने हलके आणि आरामदायी आहेत, हे मला खरोखरच वेगळे वाटते. लग्न आणि विशेष प्रसंगी असेच काहीतरी गरजेचे असते जे शाही दिसते पण घालायला सोपे वाटते. पुणे हे नेहमीच उत्तम कारागिरीची कदर करणारे शहर राहिले आहे आणि येथील लोकांसमोर ‘तस्वा’ सादर करण्यास मी उत्सुक आहे.”