केंद्रीय अर्थसंकल्प 2025: सर्वांसाठी सुलभ, परवडणारी आणि मजबूत आरोग्यसेवा

“या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनावर आधारित आहे, ज्‍याचा सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण आणि व्यापक आरोग्यसेवा प्रदान करण्याचा संकल्‍प आहे. या अर्थसंकल्पामध्‍ये आरोग्यसेवा उपायांची परवडणारी क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे, ज्यामध्ये कर्करोग, दुर्मिळ आजार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळेल.

आम्‍ही सरकासोबत सहयोगाने ‘हील इन इंडिया’ उपक्रमाद्वारे भारताला मेडिकल टूरिझमचे प्राधान्‍य गंतव्‍य म्हणून स्थान मिळवून देण्‍यास उत्सुक आहोत.
शिवाय, वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने आरोग्यसेवा प्रत्येकासाठी अधिक सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांत ७५,००० वैद्यकीय जागा वाढवणे हे प्रबळ आरोग्यसेवा कर्मचारीवर्ग तयार करण्याच्‍या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे.

प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढवल्याने भारतातील कानोकापऱ्यापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचेल, याची खात्री होईल. आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये २०० डे-केअर कर्करोग केंद्रांच्‍या स्थापनेमधून देखील आरोग्यसेवेसाठी सक्रिय दृष्टिकोन दिसून येतो, ज्यामध्ये सुलभ सोयीसुविधा आणि किफायतशीरपणावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० उपक्रमाद्वारे सरकार आपला सर्वसमावेशक विकास अजेंडा वाढवत आहे, ज्यामागे प्रमुख प्रांतांमधील मुले, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींसह नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना पोषण आधार देण्‍याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे सुधारित आरोग्य निष्‍पत्तींची खात्री मिळण्‍यासोबत देशभरातील आरोग्य असमानता दूर करून भविष्यातील पिढ्यांसाठी पाया अधिक मजबूत देखील होईल.