“या ” कारणामुळे रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना दिले जाते फिंगर बाऊल , जाणून घ्या यामागील कारण !

पुणे प्रहार डेस्क – आपल्यापैकी अनेक जण बाहेर प्रवास करत असताना तसेच एखादा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जात असतात. तिथे गेल्यावर वेगवेगळे पदार्थ आवडीने खात असतो. जेवण झाल्यानंतर अनेक रेस्टॉरंटमध्ये आपल्याला हात धुण्यासाठी एक बाऊल दिला जातो परंतु हा बाउल देण्यामागील नेमकी कारण काय असते तसेच ही पद्धत कशी पडली याबाबत अनेकांना माहिती नसते. जर तुम्हाला देखील माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

आपल्यापैकी अनेक जण असे असतात, की ज्यांना बाहेर गेल्यावर हॉटेलमधल्या अनेक पद्धती माहिती नसतात. वेगवेगळ्या चमच्यांचा अर्थ काय असतो तसेच टेबलवर बसल्यावर नेमके कोणकोणते मॅनर्स आपल्याला फॉलो करावे लागतात याबद्दल देखील अनेकांना कल्पना नसते तसेच एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तिकडच्या पद्धती देखील वेगळ्या असतात.

त्या पद्धती अनेकदा आपल्याला संभ्रमात टाकतात. जेवण झाल्यावर काही ठिकाणी हात पुसण्यासाठी टिशू पेपर दिले जातात तसेच ओल्या कपड्यांचा वापर देखील केला जातो. काही ठिकाणी एका वाटीमध्ये गरम पाणी व त्यामध्ये लिंबू चा तुकडा टाकून हात धुण्यासाठी हा बाउल दिला जातो परंतु यामागील कारण अनेकांना माहिती नसते.

जेवण झाल्यानंतर अनेकदा आपल्या हातांना तेलकटपणा आलेला असतो. तेलकट, तिखटपणा दूर व्हावा याकरिता फिंगर बाउल ग्राहकांना दिला जातो त्याचबरोबर ग्राहकांच्या हातांना तेलाचा व मसाल्याचा वास येऊ नये. हाताला रंग लागू नये याची देखील काळजी घेतली जाते. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे वेज आणि नॉनव्हेज पदार्थ आवडीने खात असतात, अशावेळी त्यांच्यामध्ये खाण्याचे रंग देखील टाकलेले असतात.

या रंगाचे डाग आपल्या हातांना लागू नये याकरिता ग्राहकांना फिंगर बाउल दिले जाते. पदार्थ खाल्ल्यानंतर हाताला कोणत्याही प्रकारचा वास येऊ नये तसेच दुर्गंधी दूर करण्यासाठी या बाऊलचा उपयोग होतो. या फिंगर बाउल ने हात धुतल्याने हात फ्रेश दिसू लागतात आणि यामुळे त्वचा देखील टवटवीत दिसते. फिंगर बाऊल चा उपयोग केल्याने हातावरील सूक्ष्म जंतू देखील नष्ट होतात. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला होत नाही.

अशा प्रकारचा फिंगर बाउल ग्राहकांना दिल्यावर आदरातिथ्य केल्याची भावना देखील ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ग्राहक त्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पुन्हा येतात अशी माहिती अनेक रेस्टॉरंट मालकांनी दिलेली आहे. त्याचबरोबर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण कशा प्रकारची सुविधा पुरवतो यावरून ग्राहक पुन्हा यायचे की नाही हे ठरवत असतो म्हणूनच प्रत्येक हॉटेल मालक ग्राहकांना जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतात