भारतातील क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर ने ‘चीता’ श्रेणीतील ट्रॅक्टर सादर केले आहेत. यांचे डिझाईन नवीन लूकसह करण्यात आले असून त्यामध्ये शक्ती, शैली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिलाफ आहे.
‘चित्त्यासारखी चपळाई आणि वेगा’ची हमी देणाऱ्या या नवीनतम हेवी-ड्युटी ट्रॅक्टर मॉडेल्समध्ये सोनालिका चीता डीआय ३२, सोनालिका चीता डीआय ३० ४डब्ल्यूडी आणि सोनालिका चीता एमएम १८ ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. शेतीतील विशेष गरज असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा ते पूर्ण करतात. या नवीन उत्पादनाद्वारे फळबागा, ऊस, डाळिंब, द्राक्षे आणि सुपारीची शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खर्च कमी करतानाच त्यांची कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्याचे उद्दिष्ट सोनालिकाने बाळगले आहे.
नवीन सोनालिका चीता मालिका शेतीच्या विविध गरजांसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर पुरवते आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांची कामे अधिक सहजतेने आणि आरामात करण्यास सक्षम करते.
*. हेवी-ड्यूटी सोनालिका चीता डीआय ३२ मध्ये ३-सिलेंडरचे २,७८० सीसी इंजिन असून ते १३० एनएम टॉर्क देते. त्याची इंधन कार्यक्षमता या वर्गातील ट्रॅक्टरमध्ये सर्वोत्तम आहे, त्यामुळे आंतर-शेती आणि बागांसाठी ते आदर्श ठरते. हा ट्रॅक्टर सिंगल-पीस बोनेट तसेच ४डी कूलिंग सिस्टम, १,३२५ किलो लिफ्ट क्षमता, ऑइल इमर्स्ड ब्रेकसह उपलब्ध आहे. कार्यक्षम वापरासाठी त्याच्यात लहान आणि मोठ्या ट्रॅकचा पर्याय आहे. याने रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि आरएमबी प्लो सारखी उपकरणे देखील सहजतेने वापरली जाऊ शकतात.
* सोनालिका चीता डीआय ३० ४डब्ल्यूडी हा पूर्णपणे सीलबंद अॅक्सल ट्रॅक्टर आहे. यामध्ये दोन -सिलेंडरचे इंधन कार्यक्षम २,०४४ सीसी इंजिन असून ते ११८ एनएम एवढा उच्च टॉर्क देते. यात अनेक प्रकारच्या उपयोगांसाठी १,१२० किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. हा सिंगल पीस बोनेट तसेच कामाच्या जास्त तासांकरिता ४डी एअर कूलिंग सिस्टमसह उपलब्ध आहे. रोटाव्हेटर, स्प्रेअर आणि पुडलिंग यांसारख्या उपकरणांसह विनाकटकट काम करण्याची तो हमी देतो आणि कमाल इंधन कार्यक्षमता देतो.
*. सोनालिका चीता एमएम १८ हासुद्धा या नवीन मालिकेत उपलब्ध आहे. यामध्ये सिंगल -सिलेंडर ८६३.५ सीसी इंजिन असून ते ४७ एनएम टॉर्क देते. यात ८०० लिफ्ट क्षमता, ट्रॉली टिपिंग पाईप, ड्युअल-स्पीड पीटीओ आणि ४डी एअर कूलिंग आहे. शेंगदाणा व ऊस पिकांमध्ये आंतर-संवर्धन कामासाठी योग्य कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसाठी हा योग्य आहे.
सोनालिका ट्रॅक्टर्सचे विक्री व विपणन विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख श्री. विवेक गोयल म्हणाले,
नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती करून त्यांना सुखी करण्यावर आमचा सातत्याने असलेला भर नवीनतम सोनालिका चीता ट्रॅक्टर दृढ करतात. डाळिंब, ऊस, फळबागा आणि सुपारीची शेती करणाऱ्या तसेच रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि आरएमबी नांगर असे विविध उपकरणे व अवजारे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या नवीन चीता ट्रॅक्टरमुळे फायदा होईल. शेतकऱ्यांच्या शक्य तितक्या जवळ राहण्यासाठी आणि आमच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांना कार्यक्षम आणि शाश्वत भविष्य देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच १०० पेक्षा जास्त डीलरशिप चालवतो. उत्पादकता वाढवणाऱ्या आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या उच्च-कार्यक्षमतेच्या ट्रॅक्टरने प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनविणे ही आमची कटिबद्धता आहे.”