‘कार्यस्थळीच्या उत्कृष्टते’बद्दल स्कोडा ऑटो फॉक्सवॅगनने पटकावले विविध पुरस्कार

  • सतत दुसऱ्या वर्षी ‘टॉप एम्पलॉयर 2025’ पुरस्कार जिंकला
  • सतत दुसऱ्या वर्षी ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता मिळवली
  • विविध इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल MENA एक्सलन्स अवॉर्ड मिळवले

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ला एक उत्कृष्ट कार्यस्थळ असल्याबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. सतत दुसऱ्या वर्षी ‘टॉप एम्प्लॉयर’ प्रमाणपत्र आणि ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ हे दोन्ही गौरव प्राप्त करून SAVWIPL ने एक उल्लेखनीय मैलाचा दगड पार केला आहे. या लक्षणीय यशाव्यतिरिक्त, कंपनीने इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल MENA अवॉर्ड्सच्या तीन श्रेणींमध्ये प्रशंसा मिळवली आहे. आपले कार्यस्थळ कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल आणि आकर्षक ठेवण्याबाबतची SAVWIPL ची वचनबद्धता या उपरोक्त सिद्धींमधून अधोरेखित होते.

टॉप एम्प्लॉयर प्रमाणपत्र हे मानव संसाधन क्षेत्रात गुणवत्तेचे प्रतीक आहे. या प्रक्रियेत विजेता निवडण्यासाठी सहा महत्त्वाच्या संस्थात्मक परिमाणांमध्ये काटेकोर मूल्यांकन सामील असते. या तपशीलवार ऑडिटमध्ये सुमारे 260 मूल्यांकनाचे निकष असतात, जे उत्कृष्ट वर्कप्लेस प्रथा आणि धोरणात्मक मानव संसाधन व्यवस्थापन सुनिश्चित करण्यातील कंपनीच्या वचनबद्धतेस प्रमाणित करतात.

 

कंपनीला सतत दुसऱ्या वर्षी ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता मिळाली. ही मान्यता ‘अनुभवणे, विचार करणे आणि कृती करणे’ या तीन मुख्य क्षेत्रांचे कर्मचाऱ्यांच्या फीडबॅकमार्फत करण्यात आलेले व्यापक मूल्यमापन तसेच सखोल ऑडिट यांच्या आधारे देण्यात आली. यावरून, कामाच्या ठिकाणी आकर्षक वातावरण निर्माण करण्यातील SAVWIPL चे यश दिसून येते.

या सिद्धींसोबत SAVWIPL ने प्रथमच इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल MENA अवॉर्ड्समध्ये सहभाग घेतला आणि कंपनीला ‘हेल्थ अँड वेलनेस एक्सलन्स’, ग्लोबल टॅलेंट अॅक्वीझिशन’ आणि ‘एन्व्हायर्नमेंटल अँड सोशल गव्हर्नन्स लीडरशिप’ या तीन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये मान्यता मिळाली.

कंपनीने मिळवलेल्या सिद्धीविषयी बोलताना स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि CEO पियुष अरोरा म्हणाले, “सलग दुसऱ्या वर्षी ‘टॉप एम्प्लॉयर’ प्रमाणपत्र मिळवणे ही केवळ गौरवाची बाब नाही, तर त्यामधून आमच्या कर्मचाऱ्यांच्या भरभराटीसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करण्याची आमची वचनबद्धता दिसून येते. आमचे यश सुनिश्चित करण्यासाठी आमच्या लोकांची किती महत्त्वाची भूमिका आहे हे आम्ही जाणतो आणि इनोव्हेशन, सचोटी, समावेशकता आणि कल्याणाच्या संस्कृतीसह आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी मनापासून काम करतो.

टॉप एम्प्लॉयर प्रमाणपत्र, ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता तसेच इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल MENA अवॉर्ड्समध्ये विविध गौरव प्राप्त करण्यातून आमच्या नितीमत्तेची आणि आमच्या समूहाच्या जागतिक दर्जाच्या वर्क कल्चरची साक्ष मिळते. आमची वाढ होत असतानाच अनुपालन, नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा यांच्या सर्वोच्च मानकांशी असलेली आमची बांधिलकी कायम आहे आणि यातून आम्ही ही खातरजमा करतो की आमचे कार्यस्थळ हे विश्वास, आदर आणि जबाबदार व्यवसाय प्रथांवर उभे आहे.”

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे CHRO सरमा चिल्लारा म्हणाले, “पुरस्कार मिळवणे ही व्यक्तिगत यशापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. हे पुरस्कार अशा वातावरणाची निर्मिती केल्याबद्दल आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबद्दल मिळाले आहेत, जेथे प्रत्येक प्रयत्न महत्त्वपूर्ण असतो आणि कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले जाते. हे तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळवल्याने, आणि त्यातील दोन तर सलग दोन वर्षे मिळवले आहेत, माझा आमच्या टीमच्या निष्ठेवरील तसेच उत्कृष्टतेची संस्कृती निर्माण करण्याच्या आमच्या एकत्रित वचनबद्धतेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

या सर्व पुरस्कारांतून समावेशक आणि पारदर्शक वर्कप्लेस प्रथा, कर्मचाऱ्याचा विकास आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावरील SAVWIPL चा धोरणात्मक फोकस प्रतिबिंबित होतो. SAVWIPL ऑटोमोटिव्ह क्षेत्रात नवनवीन बेंचमार्क स्थापन करत असताना हे मिळालेले पुरस्कार ‘एम्प्लॉयर ऑफ चॉइस’ म्हणून कंपनीची स्थिती बळकट करतात. कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांचा सहभाग यांना प्राधान्य देऊन कंपनी केवळ आपले वर्कप्लेस कल्चर उन्नत करत नाही, तर उत्कृष्टतेसाठी उद्योगाची मानके देखील पुढे नेत आहे.