रोहित आनंद आणि मिन्व्हा किम ठरले पार ३ मास्टर्स गोल्फ स्पर्धेचे विजेते

ऑक्सफर्ड रिसॉर्टमध्ये महाराष्ट्रातील पहिलीच पिच अँड पुट गोल्फ स्पर्धा

रोहित आनंद आणि मिन्व्हा किम हे महाराष्ट्रातील पदार्पणाच्या पिच अँड पुट फॉरमॅट मधील पार३ मास्टर्स गोल्फ स्पर्धेचे विजेते ठरले. पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. भारतातील सर्व लोकांसाठी गोल्फला अधिक व्यापक आणि आकर्षक बनविणे तसेच देशाला जागतिक गोल्फिंग नकाशावर नेणे हा या स्पर्धेचा हेतू होता. एका परिपूर्ण गोल्फमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

रोहित आनंद यांनी स्पर्धेतील पुरुष गटाचा करंडक जिंकला, तर जिओंगहूक ली हे उपविजेते ठरले. महिला गटात मिन्व्हा किमने अव्वल स्थान पटकावले तर अजिन ली उपविजेती ठरल्या. मिन्व्हा किम यांनी लेट्स शेव्ह क्लोजेस्ट शेव्ह होल निअरेस्ट टू द पिन स्पर्धाही जिंकली. माजी व्यावसायिक गोल्फपटू आणि प्रशिक्षक तवलीन बत्रा यांनी संपूर्ण स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले तसेच निष्पक्ष खेळ होईल, याची सुनिश्चिती केली.

या स्पर्धेत क्लब सदस्य आणि विशेष आमंत्रितांसह ८६ गोल्फपटू सहभागी झाले होता. त्या सर्वांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहभागी खेळाडूंमध्ये १६ कोरियन नागरिक आणि १२ महिला गोल्फपटू होत्या. हे सर्व नवीन फॉरमॅटमध्ये खेळण्यास उत्सुक होते. यात प्रत्येक होल पार ३ वर सेट करण्यात आला होता आणि खेळाडूंना पुटरसह फक्त तीन क्लब वापरण्याचे बंधन होते.

कॅन अँड एबल एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि पार ३ मास्टर्सचे प्रवर्तक मुनीश अरोरा म्हणाले, आम्ही ५० हून अधिक गोल्फ स्पर्धा आयोजित केल्या असून आम्ही नेहमीच कक्षा रूंदावण्याचे ध्येय ठेवले आहे. पार३ मास्टर्स-पिच अँड पुट ही त्या स्वप्नाची पूर्तता आहे आणि लवकरच भारतातील अधिक शहरांमध्ये या स्वरूपाची स्पर्धा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. गोल्फर्सना ५० ते १०० यार्ड्सचे होल असलेल्या कोर्सवर विशिष्ट आव्हानाचा सामना करावा लागला. त्यामध्ये त्यांना फक्त तीन क्लब वापरत अचूकता, रणनीती आणि कौशल्याचे प्रदर्शन करावे लागले.

ऑक्सफर्ड ग्रुपचे अध्यक्ष आणि गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन ऑफ इंडियाचे (जीआय) अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर म्हणाले, पिच अँड पुटमध्ये गोल्फला अधिक लोकप्रिय आणि सुलभ बनवण्याची मोठी क्षमता आहे. प्रेक्षकांमध्ये प्रिय आणि शाश्वत क्रीडा मालमत्ता बनू शकण्याची क्षमता असणारे हे स्वरूप आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि अधिकाधिक उत्साही लोकांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही ९-होल कोर्स तयार करण्याचाही करत आहोत.

या स्पर्धेच्या यशाने उत्साहित असलेले ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे सीओओ कौशिल व्होरा म्हणाले, ही एक अद्भुत संधी होती. आमच्या सदस्यांना हे स्वरूप आवडेल, हे मला माहीत होते. केवळ दोन दिवसांत यातील सर्व जागा भरल्या गेल्या यातून त्याचे आकर्षण सिद्ध होते. इतक्या मोठ्या प्रमाणात पिच अँड पुट पहिल्यांदाच सादर करण्याचा मान आम्हाला मिळाला, याचा आम्हाला आनंद आहे. ती इतक्या यशस्वीरीत्या पूर्ण झाली हे अत्यंत उत्साह वाढविणारे आहे.