- कंपनीने स्थानिक कॉस्मेटिक स्टोअर्समध्ये उपलब्धता वाढवण्यासाठी वितरक-नेतृत्वित मॉडेलचा अवलंब केला आहे
- आपल्या रिटेल टचपॉइण्ट्समध्ये वाढ करत आणि उच्च क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करत ब्रँडचा अधिकाधिक ग्राहकांशी कनेक्ट होण्याचा, तसेच उच्च दर्जाचा ब्युटी शॉपिंग अनुभव देण्याचा मनसुबा आहे
ब्युटी व कॉस्मेटिक्स उद्योगामधील उपस्थिती अधिक दृढ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत मिला ब्युटी या जागतिक दृष्टिकोन असलेल्या भारतीयांच्या त्वचेच्या अनुकूल ब्युटी ब्रँडने २०२५ मध्ये आपली रिटेल उपस्थिती वाढवण्याची योजना आखली आहे. ३०० हून अधिक शहरांमधील ११,५०० रिटेल टचपॉइण्ट्समध्ये प्रबळ उपस्थितीसह ब्रँड द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आपली पोहोच अधिक दृढ करण्यास सज्ज आहे, ज्यामुळे लाखो ग्राहकांना किफायतशीर व प्रीमियम कॉस्मेटिक्स उपलब्ध होतील.
मिला ब्युटी बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी आपल्या यशस्वी रिटेल मॉडेलला अधिक दृढ करेल, जेथे ग्राहक मेकअप खरेदींसाठी प्रत्यक्ष स्टोअर्सवर अवलंबून आहेत. हा दृष्टिकोन ब्रँडची सोईस्कर ठिकाणी उपस्थिती असण्याची खात्री देतो, ज्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांबाबत जाणून घेता येईल. भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या मध्यम-उत्पन्न वर्गातील कुटुंबांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत ब्रँड उच्च स्थानिक उपस्थितीसह किफायतशीर, उच्च दर्जाच्या ब्युटी उत्पादनांसाठी बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण तफावतीला दूर करत आहे.
वर्षानुवर्षे, मिला ब्युटीने पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात यांसारख्या प्रांतांमध्ये प्रबळ उपस्थिती निर्माण केली आहे. पण, दक्षिण भारत ब्रँडसाठी संधीचे प्रमुख क्षेत्र आहे, तसेच पूर्व व ईशान्य बाजारपेठांमध्ये देखील प्रवेश केला आहे. ब्युटी उत्पादनांसाठी वाढती मागणी आणि वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गासह प्रांत विकासासाठी मोठी क्षमता देतो. या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी मिला ब्युटीची रिटेल नेटवर्क विस्तारित करत आणि प्रांतामधील व्यक्तींच्या त्वचा व हवामान स्थितींना अनुकूल उत्पादने सादर करत आपली उपस्थिती प्रबळ करण्याची योजना आहे.
मिला ब्युटीचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक साहील नायर म्हणाले, ”आमचे प्रत्येक भारतीयांशी ते कुठेही राहत असले तरी संलग्न होणारा ब्रँड डिझाइन करण्याचे मिशन आहे. २०२५ साठी या विस्तारीकरण धोरणासह आम्ही मिला ब्युटीला भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जात आहोत, ज्यामधून लहान शहरांमधील ग्राहकांना देखील मेट्रो शहरांप्रमाणे प्रीमियम दर्जाची उत्पादने उपलब्ध असण्याची खात्री मिळेल. हा पुढाकार आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असण्यासोबत ब्युटी सर्वांसाठी सर्वसमावेशक, सहजसाध्य व प्रायोगिक करण्याच्या दिशेने पाऊल देखील आहे.”
मिला ब्युटी अर्धदशलक्ष ग्राहकवर्गासह भारतभरात उपस्थिती झपाट्याने वाढवत आहे. ते फेस, लिप व आय (चेहरा, ओठ व डोळे) अशा सर्व प्रमुख मेकअप श्रेणींमध्ये उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी देतात, ज्यामधून प्रत्येक भारतीयाच्या स्किन टोनसाठी काहीतरी उपलब्ध असण्याची खात्री मिळते. त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये फिक्सर्स, प्राइमर्स, कन्सीलर्स, कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक्स आणि ग्लॉस अशा मागणीदायी उत्पादनांचा समावेश आहे. देशातील सर्व प्रांतांमध्ये व्यापक विकासासाठी प्रबळ योजनांसह मिला ब्युटी भारतातील घराघरांमध्ये लोकप्रिय बनण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करत आहे, ज्यासाठी सर्व रिटेल टचपॉइण्ट्सवर आकर्षक दरांमध्ये उच्च दर्जाची उत्पादने देत आहे, जी ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहेत.