व्हॅलेंटाइन डेला पुण्यात फ्रोझन स्नॅक्सला वाढती पसंती – 21% लोकांची निवड!

गोदरेज यम्‍मीजच्‍या भारतातील फ्रोझन स्‍नॅक रिपोर्ट २०२४ मधून निदर्शनास आले की पुण्‍यामध्‍ये व्‍हॅलेंटाइन्‍स डेला फ्रोझन स्‍नॅक्‍सला अधिक पसंती, जेथे २१ टक्‍के व्‍यक्‍तींनी फ्रोझन स्‍नॅक्‍सची निवड केली

व्‍हॅलेंटाइन्‍स डेसाठी फ्रोझन स्‍नॅक्‍सना लोकप्रियता मिळत असताना विक्रोळी कुसिनाचे ‘द परफेक्‍ट पेअरिंग’ एका भाग्‍यवान जोडप्‍यासाठी खाजगी शेफ अनुभवासह हा दिवस खास करण्‍याकरिता सज्‍ज आहे

राष्‍ट्रीय, १४ फेब्रुवारी २०२५: फूडमध्‍ये व्‍यक्‍तींना कनेक्‍ट करण्‍याची अद्वितीय क्षमता आहे आणि गोदरेज इंडस्‍ट्रीज ग्रुपची पाककला मालकीची मीडिया प्रॉपर्टी विक्रोळी कुसिनाला माहित आहे की, फूड संस्‍मरणीय क्षणांना आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. असे म्‍हणतात की ‘मन जिंकण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे स्‍वादिष्‍ट पाककला’ आणि गोदरेज फूड्सचा किचनमध्‍ये मोठा वाटा आहे, ज्‍यामध्‍ये गोदरेज यम्‍मीजपासून इतर सोईस्‍कर, उच्‍च गुणवत्तेच्‍या फूड उत्‍पादनांचा समावेश आहे. यामुळे यंदाच्‍या प्रेमाच्‍या सीझनदरम्‍यान समुदायाला काहीतरी विशेष पाककलांचा आस्‍वाद देणे स्‍वाभाविक होते.

व्‍हॅलेंटाइन्‍स डे जवळ आला असताना विक्रोळी कुसिनाचा ग्राहकांना प्रेम, संबंध व सोयीसुविधेच्‍या पैलूंचा अनुभव घेण्‍याची संधी देण्‍याचा मनसुबा होता. गोदरेज इकोसिस्‍टममधील ब्रँड्स रेडी-टू-कूक उत्‍पादनांमध्‍ये विशेषीकृत आहेत, जे कोणालाही सहजपणे स्‍वादिष्‍ट आहार तयार करण्‍यास मदत करतात. यंदा, या उपक्रमाने अधिक पुढाकार घेतला. द परफेक्‍ट पेअरिंग’ मोहिमेच्‍या माध्‍यमातून विक्रोळी कुसिनाने प्रत्‍येक संभाव्‍य व्‍यत्‍ययाला दूर करत निष्‍ठावान ग्राहकांना खास अनुभव दिला, जेथे त्‍यांना कूकिंग, प्‍लेटिंग किंवा उत्‍साहपूर्ण वातावरण निर्माण करण्‍यासंदर्भात कोणत्‍याही गोष्‍टीबाबत चिंता करण्‍याची गरज लागली नाही.

सहभागींना डिश पेअरिंगच्‍या स्‍वरूपात त्‍यांच्‍या प्रेमगाथा शेअर करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. एका भाग्‍यवान जोडप्‍याची निवड करण्‍यात आली, ज्‍यांना त्‍यांच्‍या घरामधून आरामात सर्वोत्तम शेफ-क्‍यूरेटेड डायनिंग अनुभव मिळाला. प्रतिष्ठित शेफ-फॉर हायर सर्विस बुक माय शेफसोबत सहयोगाने ही मोहिम खात्री घेते की उत्‍साहवर्धक वातावरणापासून आहारापर्यंत सायंकाळच्‍या भेटीमधील प्रत्‍येक पैलूची काळजी घेतली जाईल, ज्‍यामध्‍ये गोदरेज फूड्स उत्‍पादन श्रेणीचा समावेश असेल.

फूड निश्चितच अनेक उत्‍साहपूर्ण क्षणांचा, विशेषत: रोमँटिक क्षणांचा अविरत भाग आहे, पण व्‍हॅलेंटाइन्‍स डेला बाहेर जाऊन आहाराचा आस्‍वाद घेण्‍यासाठी गर्दीने भरलेले रेस्‍टॉरंट्स, आरक्षणांवर देखरेख आणि डाइनसाठी स्‍थान आरक्षित करण्‍याचे आव्‍हान अशा समस्‍यांचा सामना करावा लागतो. गोदरेज यम्‍मीजच्‍या एसटीटीईएम २.० इंडियाज फ्रोझन स्‍नॅकिंग रिपोर्टनुसार, ५ पैकी १ भारतीय (२० टक्‍के) रोमँटिक क्षण किंवा डेटदरम्‍यान फ्रोझन स्‍नॅक्‍सचा आस्‍वाद घेतात. हा ट्रेण्‍ड विशेषत: ३६ ते ४० वर्ष वयोगटामध्‍ये सर्वाधिक आहे, जेथे २७ टक्‍के व्‍यक्तींनी अशा प्रसंगांसाठी फ्रोझन स्‍नॅक्‍सची निवड केली. यामधून दिसून येते की, सोईस्‍कर व स्‍वादिष्‍ट फूड विविध पिढ्यांमधील व्‍यक्‍तींमध्‍ये लोकप्रिय निवड आहे.

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत गोदरेज फूड्स लि.च्‍या मार्केटिंग अँड इनोव्‍हेशनच्‍या प्रमुख अनुश्री देवेन म्‍हणाल्‍या, “गोदरेज फूड्समध्‍ये आमचा विश्‍वास आहे की प्रत्‍येक आहार म्हणजे अद्वितीय अनुभव असला पाहिजे, जो साधारण क्षणांना अत्‍यंत खास बनवतो. गोदरेज यम्‍मीजसह आम्‍ही रेस्‍टॉरंटमधील डायनिंग अनुभव प्रत्‍यक्ष तुमच्‍या घरामध्‍ये देतो, ज्‍यामुळे सेलिब्रेशन्‍स अधिक संस्‍मरणीय बनतात. यंदा व्‍हॅलेंटाइन्‍स डेला आमची परफेक्‍ट पेअरिंग’ मोहिम या दृष्टिकोनाला अधिक पुढे घेऊन जाते, तसेच तुमच्‍या सोयीनुसार फाइन डायनिंगचा आनंद देण्‍यासाठी शेफ-क्‍यूरेटेड अनुभव देते. उत्तम फूड फक्‍त आस्‍वाद घेण्‍यासाठी नाही तर त्‍यामधून संस्‍मरणीय क्षण देखील निर्माण होतात.”

बुकमायशेफचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमोद जयवरापू म्‍हणाले, “बुकमायशेफमध्‍ये आमचे साधारण आहारांना असाधारण अनुभवांमध्‍ये बदलण्‍याचे मिशन आहे. आम्‍ही अमिशा रंका व मोहनीश सेमलानी यांना स्‍पेशल अनुभव देण्‍यासाठी उत्‍सुक आहोत. त्‍यांना आहाराचा आस्‍वाद मिळण्‍यासोबत सेलिब्रेशन व अद्वितीय नात्‍याच्‍या क्षणांचा आनंद देखील मिळेल, जो त्‍यांच्‍या कायमस्‍वरूपी स्‍मरणात राहिल. विक्रोळी कुसिनासोबत सहयोगाने काम करत आम्‍ही प्रत्‍येक पैलू काळजीपूर्वक डिझाइन केले जाण्‍याची खात्री घेत आहोत, तसेच आम्‍ही त्‍यांना संस्‍मरणीय व्‍हॅलेंटाइन्‍स डेचा आनंद देण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

प्रेम, फूड व रोमँटिक अनुभवांना एकत्र करत द परफेक्‍ट पेअरिंग’ मोहिमेने सिद्ध करून दाखवले की सर्वात उत्‍साहपूर्ण व्‍हॅलेंटाइन्‍स डे आठवणींसाठी फक्‍त रेस्‍टॉरंटची गरज नाही तर कधी-कधी परिपूर्ण आहार, योग्‍य सहवास आणि प्रेमाच्‍या अनुभवासह अशा आठवणी घरामध्‍ये देखील मिळू शकतात.