देशातील अग्रगण्य कपडे उत्पादक कंपनी कॅन्टाबिल रिटेल इंडियाने पुण्यात आंबेगाव इथे नव्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे कंपनीच्या देशभरातील स्टोअर्सची संख्या ५८३ वर गेली आहे. कॅन्टाबिलच्या या स्टोअरमध्ये मेन्स वेअर आणि अॅक्सेसरीजचे संपूर्ण कलेक्शन उपलब्ध आहे.अंदाजे ११५९ चौ.फुटांच्या प्रशस्त जागेमध्ये हे स्टोअर विस्तारले असून ग्राहकांना इथे मनसोक्त शाँपिंगचा अनुभव घेता येईल.
नव्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी कॅन्टाबिल रिटेल इंडियाचे संचालक दीपक बन्सल म्हणाले की, “आंबेगावमधील आमच्या स्टोअरचा शुभारंभ पुण्यासारख्या प्रमुख महानगरीय क्षेत्रांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यावर आम्ही धोरणीपणे लक्ष केंद्रित केल्याचे प्रतीक आहे. वाजवी किंमतींमध्ये उच्च दर्जाचे कपडे पुरविण्याशी आणि हे करताना विस्तारत्या नागरी भागांतील आमच्या ग्राहकांना आमची उत्पादने सहज उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्याशी आम्ही बांधील आहोत.”