पुणे प्रहार डेस्क – भाजप शिंदे यांच्या महायुती सरकारने निवडणूक दरम्यान लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री लाडकी योजना ही अन्य राज्यांमध्ये राबवलेली होती. जर महाराष्ट्र जनतेने भाजपा शिंदे चे सरकार आणल्यास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडके योजना राबवली जाईल, असा उल्लेख प्रचार दरम्यान केला होता. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीने देखील सरकारला जिंकून दिले. जिंकून देण्याआधी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा देखील झाले होते. निवडणुकीच्या नंतर पंधराशे रुपये वरून 2100 रुपये असे होतील, असे देखील विद्यमान सरकार द्वारे म्हटले गेले होते परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे.
अनेक उलट सुलट चर्चा या योजने संदर्भात निर्माण झाल्या होत्या म्हणूनच महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी देखील संभ्रमात जगताना दिसून येत होत्य. या योजनेमुळे अनेक बहिणींना सहाय्य मिळाले. अनेकांनी सुखाची दिवाळी देखील साजरी केली परंतु नुकत्याच आलेल्या बातमीमुळे पुन्हा या लाडक्या बहिणी नाराज झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार पाच लाख लाडक्या बहिणी आता सावत्र झाले आहेत याचाच अर्थ पाच लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी करण्यात आलेल्या आहे. त्यामागे कारणे देखील वेगवेगळ्या आहेत. घडलेले या घटनेमुळे लाडक्या बहिणींच्या गोटातून नाराजीचा सूर उमटत आहे.
या योजनेच्या लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींच्या आकडेवारी मध्ये डिसेंबर महिन्यात या बहिणींची संख्या दोन कोटी 46 लाख इतकी होती पण जानेवारी महिन्यामध्ये दोन कोटी 41 लाख एवढी झालेली आहे.
पाच लाख संख्या कमी झाल्यामुळे नेमकी काय कारण आहे याबद्दल देखील चर्चा रंगत आहेत.
नुकतेच महिला विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल ५ लाखांनी कमी आला आहे.
हा आकडा कमी झाल्याचे कारण देखील वेगवेगळ्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी एका योजनेचा लाभ घेत असताना अन्य योजनेचा लाभ देखील घेत आहे अशी माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे वय 65 पर्यंत आहे परंतु अनेक महिला 65 पेक्षा जास्त वयोगटाच्या देखील लाभ घेताना दिसून आलेले आहेत. या योजनेचा लाभ घेत असताना महिलांकडून हमीपत्र जमा करण्यात आलेले होते.
या हमीपत्र समाविष्ट केलेल्या अटी व नियम यांची पूर्तता अनेक महिन्यांच्या बाबतीत होत नसल्या कारणांमुळे देखील या लाडक्या बहिणींचे फॉर्म अवैध ठरले गेले परंतु याच महिलांच्या खात्या मध्ये यापूर्वी पैसे देखील जमा करण्यात आले होते परंतु भविष्यात यांच्या खात्यात आता पैसे जमा केले जाणार नाही याची माहिती देखील महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. ही योजना बंद होणार नसून भविष्यात या योजने संदर्भातील विविध तरतुदी निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करत आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली.