तुळस, आले आणि इतर औषधी वनस्पती: आरोग्याची गुरुकिल्ली

एकंदरीत आरोग्य चांगले राहावे यासाठी सातत्याने, जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. सर्वगुणसंपन्न पदार्थांची निवड करून आपल्या शरीराला पोषण पुरवल्याने संतुलित जीवनशैली राखण्यात मदत मिळते. वेगवेगळ्या नैसर्गिक वनस्पतींचा समावेश असलेला चहा एकंदरीत आरोग्याला पूरक ठरणारा एक प्रभावी मार्ग आहे. विशिष्ट चव, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, मसाले आणि त्यांचे घरच्या घरी तयार केलेले मिश्रण घालून रोजचा चहा करण्याची पद्धत भारतीय स्वयंपाकघरांमध्ये पूर्वापारपासून वापरली जात आहे. जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये किमान एक किंवा अनेक नैसर्गिक सामग्री वापरून चहा करण्याची पद्धत रूढ आहे.

टाटा टी गोल्ड केयरमध्ये आले, वेलची, तुळस, मुलेठी आणि ब्राह्मी याच पाच सामग्रींचा समावेश आहे. हा चहा स्वादिष्ट तर आहेच, शिवाय विशिष्ट आरोग्य लाभ मिळवून देणारे पदार्थ देखील यामध्ये आहेत. त्यामुळेच हा सर्वगुणसंपन्न चहा आहे.

टाटा टी गोल्ड केयरमध्ये वापरण्यात आलेले सर्व पदार्थ भारतीय परंपरेमध्ये पूर्वापारपासून वापरण्यात येत आहेत आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या विशिष्ट लाभांसाठी ओळखले जातात.

 ब्राह्मी

स्मरणशक्ती वाढवण्याचे गुण असलेली ब्राह्मी आकलनात्मक बुद्धीचे आरोग्य आणि मानसिक सुस्पष्टता यासाठी सर्रास वापरली जाते.

 मुलेठी

घसा दुखणे, सर्दी आणि खोकला असे त्रास बरे करण्याचे गुण मुलेठीमध्ये आहेत, श्वसनमार्गाच्या आजारांवर हमखास उपाय म्हणून मुलेठीचा वापर पूर्वापारपासून केला जात आहे.

 वेलची

भारतीय पाककृतींमध्ये अत्यावश्यक मानली जाणारी आणि जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक वेलची अप्रतिम स्वाद व सुगंध तर देतेच, शिवाय पचनामध्ये मदत करते.

 तुळस

‘नैसर्गिक औषधी वनस्पतींची महाराणी’ तुळस रोगप्रतिकार शक्ती बळकट करते व एकंदरीत आरोग्य चांगले राखते.

 आले

हे मूळ बहुगुणी आणि अनेक पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. सामान्य सर्दी, खोकला आणि पचनाच्या समस्यांवर हमखास उपाय म्हणून आल्याचा वापर घराघरांत केला जातो.

 विशिष्ट नैसर्गिक गुणधर्म असलेल्या या वनस्पतींपासून बनवलेले हर्बल चहा आरोग्याला पूरक ठरतात, इतकेच नव्हे तर ते प्यायल्याने आराम देखील मिळतो. गरमागरम चहाचा एक कप आराम देतो, हायड्रेशनला पूरक ठरतो, मन आणि शरीर शांत करून स्वानुभूती मिळवण्याचा एक खूप सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. एकंदरीत आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील हर्बल चहा खूप उपयुक्त ठरतो. विशिष्ट चव आणि गुणधर्म असलेली नैसर्गिक सामग्री घालून केलेला चहा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा, जो तुम्हाला पोषण मिळवून देईल, ताजेतवाने ठेवेल.

 किंमत: ५०० ग्रॅम फक्त ३२५ रुपये.