बीएएसएफच्या ‘वाह रे किसान’ मोहीमेच्या अंतर्गत ह्या भूमीवर सर्वश्रेष्ठ काम करणार्या असामान्य शेतकर्यांचा गौरव केला जातो
- सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलेव्हिजन कलाकार, श्री. अन्नू कपूर हे संयोजन करत असलेली ही मोहीम शेतीशी संबंधित पहिली इन्फोटेनमेंट मोहीम आहे.
- ह्या मोहीमेत 5 प्रेरणादायी शेतकर्यांच्या कहाण्या आणि ते त्यांच्या आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात कसे परिवर्तन घडवितात यावर प्रकाश टाकला जातो.
बीएएसएफ द्वारा त्यांची ‘वाह रे किसान’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम बीएएसएफच्या या भूमीवरील सर्वाधिक मोठे कार्य या मोहीमेचा भाग आहे आणि त्यात आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात परिवर्तन घडविणार्या
5 शेतकर्यांवर प्रकाश टाकला जातो.
बीएएसएफने श्री. अन्नू कपूर यांची या मोहीमेचे संयोजन करण्यासाठी नेमणूक केली आहे आणि हे भाग केवळ या मालिकांचे बीएएसएफच्या खास यूट्यूब आणि फेसबूक चॅनल्सवर प्रसारण करण्यात येते. या मालिकांचे प्रसारण सुरू करण्यापूर्वी सुमारे महिनाभर सामाजिक प्रसार माध्यमांवर महिनाभर मोहीम राबविण्यात आली ज्याद्वारे त्यांच्या कहाण्या सादर करण्यास सांगण्यात आले ज्यातून शेवटी ‘वाह रे किसान’ मोहीमेसाठी
5 सर्वाधिक प्रेरणादायी कहाण्या सादर करणार्या शेतकर्यांची निवड करण्यात आली.
‘‘भूमीवर सर्वश्रेष्ठ काम” ही बीएएसएफ कृषि निराकरणांसंबंधी जागतिक मोहीम आहे आणि शेतकर्यांना प्रकाशझोतात आणि त्यांचे कौतूक करणे अतिशय योग्य आहे. भारतातील वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि कृषि पद्धतींच्या पार्श्वभूमीवरील 5 नाविन्यपूर्ण शेतकर्यांची भेट घेताना मला अतिशय आनंद झाला, ज्यांचा ‘वाह रे किसान’ मध्ये समावेश करण्यात आला आहे आणि आपण शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांच्यासोबत काम करत असताना इतरही अनेक शेतकरी त्यांचे अनुकरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेतील अशी मला अपेक्षा आहे, लिविओ टेडेसची, प्रेसिडेंट, अॅग्रीकल्चरल सोल्यूशन्स, बीएएसएफ एसई सांगतात.
- मालिका एक: उर्जेच्या बाबतीत कार्यक्षम व कमी खर्चाचा सौर ड्रायरचा शोध ज्यामुळे शेतकर्यांना कापणीनंतर होणारे पिकाचे नुकसान कमी करण्यास मदत होईल. [श्री. तुषार गावरे, महाराष्ट]
- मालिका दोन: एका अशा शेतकर्यांची गोष्ट ज्याने केवळ त्याच्या शेतजमिनीचे परिवर्तन केले नाही तर नाविन्यपूर्ण पद्धतींसह संघटित शेती सादर करून संपूर्ण गावात परिवर्तन केले. [श्री. मंजन्ना टी. के., कर्नाटक]
- मालिका तीन: भाताची लायब्ररी जिने भारतातील स्थानिक विविध प्रकारांचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. [श्री. महान चंद्र बोरा, आसाम]
- मालिका चार: पारंपारिक पिक पद्धतीला तोंड द्याव्या लागणारा पाण्याचा तुटवडा हाताळण्यासाठी वैविध्यपूर्ण कृषि पद्धतीची कशी मदत होते. [श्री. सरवण सिंग चंदी, पंजाब]
- मालिका पाच: सफरचंदाच्या लो चिलिंग प्रकाराद्वारे पारंपारिक कृषि पद्धतीत परिवर्तन. [श्री. हरिमण शर्मन, हिमाचल प्रदेश]
‘‘आम्हाला ‘वाह रे किसान’ ही मोहीम सुरू करताना आणि संपूर्ण भारतातील शेतकर्यांच्या लक्षणीय यशाचा सोहळा साजरा करताना अतिशय आनंद होत आहे,’’ गिरिधर रानुवा, बिझनेस डायरेक्टर, बीएएसएफ अॅग्रीकल्चरल सोल्यूशन्स, भारत म्हणाले. आता पर्यंत ”‘वाह रे किसान’ ही मोहीम सोशल मिडियावर 35 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे, आणि शेतकर्यांना तोंड द्याव्या लागणार्या समस्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. इन्फो-टेनमेन्ट मालिकेच्या सहाय्याने, आपल्या शेतकर्यांच्या अतिशय सृजनशील प्रयत्नांची चर्चा सर्वत्र होणे गरज आहे कारण इकडे शहरात राहणारे आपण ह्या सर्व गोष्टी गृहित धरतो कारण आपले अन्न कसे तयार होते त्यात आपला काहीही सहभाग नसतो.”
ह्या पाच शेतकर्यांच्या गोष्टींचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध फिल्म व टेलेव्हिजन कलाकार, श्री. अन्नू कपूर यांनी केले असून त्या येथे उपलब्ध आहेत: BASF Agro India – YouTube 2025 च्या आगामी महिन्यांमध्ये, ‘वाह रे किसान’ च्या दुसर्या भागात नवीन शेतकर्यांच्या वेगळ्या कहाण्या प्रदर्शित करण्याची बीएएसएफची योजना आहे.
बीएएसएफच्या ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स डिव्हीजन विषयी
आम्ही जे काही करतो, ते सर्व शेतकर्यांवरच्या प्रेमापोटी करतो. पर्यावरणावर पडणारा ताण कमी करत असतानाच वेगाने वाढणार्या लोकसंख्येला आरोग्यकारक व परवडणार्या किंमतीत अन्न पुरवठा करण्यासाठी शेती ही मूलभूत गरज असलेली गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही सर्व व्यावसायिक निर्णयांमध्ये शाश्वतता निकषांचा समावेश करण्यासाठी सहकारी आणि तज्ञांसोबत काम करत आहोत. आम्ही 2023 मध्ये सक्षम संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात 900 दशलक्ष युरो इतकी भक्कम गुंतवणूक करत आहोत, ज्यात या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि व्यावहारिक कार्यपद्धती यांचा समावेश आहे. आमची निराकरणे वेगवेगळ्या पीक पद्धतींच्या द़ृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहेत. शेतकरी, उत्पादक आणि मूल्य श्रृंखलेतील आमच्या इतर सहकार्यांना सर्वोत्तम संभाव्य परिणाम साध्य करण्यात मदत व्हावी यासाठी बियाणे आणि त्यांची वैशिष्ट्ये, पीक संरक्षण उत्पादने, डिजिटल साधने आणि शाश्वतता द़ृष्टिकोन यांचा परस्परांशी संबंध लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रयोगशाळेत, शेत, कार्यालय आणि उत्पादन या विविध क्षेत्रातीं टीम्ससह, आम्ही कृषि क्षेत्रासाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी आमच्या अखत्यारित असलेल्या सर्व गोष्टी करत आहोत. 2023 मध्ये, आमच्या विभागाने 10.1 अब्ज युरोची विक्री केली. अधिक माहितीसाठी कृपया व्हिजिट करा www.agriculture.basf.com किंवा आमच्या सोशल मिडीया चॅनल्सपैकी काहीही.
भारतातील बीएएसएफ विषयी
बीएएसएफने 130 वर्षापासून अधिक काळ भारताच्या प्रगतीमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतला आहे. सन 2023 च्या अखेरीस, बीएएसएफकडे संपूर्ण देशातील 8 उत्पादन केंद्रे व 42 कार्यालयासह भारतात 2,335 कर्मचारी होते. इनोवेशन कॅम्पस मुंबई आणि मंगलोरमधील कोटिंग्स टेक्निकल सेंटर हे दोन्ही बीएएसएफच्या ग्लोबल टेक्नॉलॉजी प्लॅटफार्मचा भाग आहेत. सन 2023 मध्ये बीएएसएफने भारतातील ग्राहकांना अंदाजे €2.4 बिलियन एवढ्या विक्रीची नोंद केली. अधिक माहिती www.basf.com/in वर उपलब्ध आहे.
बीएएसएफ विषयी
बीएएसएफ मध्ये आम्ही भविष्यातील गरजा भागविण्यासाठी रसायने तयार करतो. आम्ही पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांच्या बरोबर आर्थिक यशाची सांगड घालतो. बीएएसएफ समूहातील सुमारे 112,000 कर्मचारी जगातील जवळपास प्रत्येक देश आणि प्रत्येक क्षेत्र यामधील आमच्या ग्राहकाच्या यशामध्ये योगदान देतात. आमचा पोर्टफोलिओ सहा विभागांपासून बनलेला आहे: रसायने, सामुग्री, औद्योगिक साधने, सर्फेस टेक्नॉलॉजीज, पोषण व निगा आणि कृषीविषयक उपाययोजना बीएएसएफने 2023 मध्ये €68.9 बिलियन एवढी विक्री केली आहे. बीएएसएफच्या समभागांचा फ्रँकफर्ट (बीएएस) मधील स्टॉक एक्स्चेंजवर आणि यूएस मध्ये अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स (बीएएसएफवाय) म्हणून सौदा केला जातो. अधिक माहितीसाठी www.basf.com.