---Advertisement---

महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे शास्त्र समजून घ्या ! – सनातन संस्था

By: Editor _2

On: Sunday, February 23, 2025 6:53 PM

Google News
Follow Us
---Advertisement---
पुणे – महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे महत्त्व आणि शास्त्र जाणून घ्या आणि धर्माचरण करा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रा.विठ्ठल जाधव यांनी केले आहे.
शिवतत्त्व, अर्थात शक्ती 1 सहस्रपटींनी कार्यरत असणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री ! यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात विशेष ग्रंथ प्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. भगवान शिवाची वैशिष्ट्ये, शिवाची उपासना कशी करावी, शिवपिंडीचे प्रकार, शिवाला बेल वहाण्याचे महत्त्व, रुद्राक्षाचे महत्त्व, शिवाच्या नावांचा आध्यात्मिक अर्थ तसेच शिवोपासना नेमकी कशी करायची याची माहिती देणारे विविध अध्यात्मिक ग्रंथ आणि साहित्य या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या दृष्टीने ‘आपल्या शहरातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शन कक्षांना भेट देऊन शिव देवतेविषयी धर्मशास्त्रीय माहिती घेऊन शिवतत्त्वाचा लाभ करून घ्या,’ असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे येथे पुढील ठिकाणी लागणार ग्रंथ कक्ष !

पुणे शहर परिसरात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 16 ठिकाणी हे ग्रंथ कक्ष लावण्यात येणार आहेत. त्यापैकी प्रमुख ठिकाणचे कक्ष खालीलप्रमाणे:

1. निलकंठेश्वर मंदिर, कुबेरा संकुलासमोर, गाडीतळ, हडपसर, पुणे वेळ – सकाळी 7 ते रात्री 8

2. चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर, लोहिया उद्यान, मगरपट्टा चौक, हडपसर वेळ – सकाळी 6 ते रात्री 9

3. अरण्येश्वर मंदिर, सहकारनगर वेळ – सकाळी 7 ते रात्री 9

4. शिव मंदिर, महेश सोसायटी, बिबवेवाडी, पुणे वेळ – सकाळी 7 ते रात्री 9

5. श्री बनेश्वर मंदिर, नसरापूर, भोर वेळ – सकाळी 8 ते रात्री 8

6. नीलकंठेश्वर मंदिर, जांभळी डोंगर, डावजे, पुणे
वेळ – सकाळी 7 ते रात्री 10

7. ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ, पुणे वेळ – सकाळी 6.00 ते रात्री 10 .00

8. श्री विश्वेश्र्वर मंदिर, सदाशिव पेठ,पुणे
वेळ – सकाळी 6.30 ते रात्री 9

9. धारेश्वर मंदिर, धायरी, सिंहगड रस्ता पुणे वेळ – सकाळी 6 ते रात्री 8.30

10. महेश सोसायटी,शिव मंदिर, बिबवेवाडी, पुणे
वेळ – 7 ते रात्री 9

11. सोमेश्वर मंदिर विश्रांतवाडी धानोरी रोड पुणे 15
वेळ – सकाळी 6.30 ते रात्री 9.00

सर्वसमावेशक ग्रंथ आणि साधनेला साहाय्यकारक सात्त्विक उत्पादने एकत्रित उपलब्ध !

या कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार, आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध असेल. ही अनमोल ग्रंथसंपदा जिज्ञासूंना ज्ञानार्जनासह साधनेसाठी मार्गदर्शन करणारी आहे. यासह गोमूत्र अर्क, जपमाळ, सात्त्विक अगरबत्ती, भीमसेनी कापूर, सात्त्विक अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शन कक्षांवर मिळतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी (7038713883) या क्रमांकावर संपर्क करावा.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026