---Advertisement---

महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे शास्त्र समजून घ्या ! – सनातन संस्था

By: Editor _2

On: Sunday, February 23, 2025 6:45 PM

Google News
Follow Us
---Advertisement---

 

पिंपरी चिंचवड – महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे महत्त्व आणि शास्त्र जाणून घ्या आणि धर्माचरण करा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रा.विठ्ठल जाधव यांनी केले आहे.

शिवतत्त्व, अर्थात शक्ती 1 सहस्रपटींनी कार्यरत असणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री ! यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे विशेष ग्रंथ प्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. भगवान शिवाची वैशिष्ट्ये, शिवाची उपासना कशी करावी, शिवपिंडीचे प्रकार, शिवाला बेल वहाण्याचे महत्त्व, रुद्राक्षाचे महत्त्व, शिवाच्या नावांचा आध्यात्मिक अर्थ तसेच शिवोपासना नेमकी कशी करायची याची माहिती देणारे विविध अध्यात्मिक ग्रंथ आणि साहित्य या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या दृष्टीने ‘आपल्या शहरातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शन कक्षांना भेट देऊन शिव देवतेविषयी धर्मशास्त्रीय माहिती घेऊन शिवतत्त्वाचा लाभ करून घ्या,’ असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड येथे पुढील ठिकाणी लागणार ग्रंथ कक्ष !

पिंपरी चिंचवड येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 19 ठिकाणी हे ग्रंथ कक्ष लावण्यात येणार आहेत. त्यापैकी प्रमुख ठिकाणचे कक्ष खालीलप्रमाणे:

1. शिवशंभो फाऊंडेशन, शाहूनगर, चिंचवड वेळ – सकाळी 9.00 ते रात्री 8.30

2. धनेश्वर मंदिर, चिंचवडगाव
वेळ – सकाळी 9 ते रात्री 9

3. शिव मंदिर, वाकड गावठाण,वाकड, चिंचवड, पुणे
वेळ – सकाळी 10 ते सायं 7.00

4. श्री महादेव मंदिर, पिंपळे सौदागर, पिंपरीगाव
वेळ – सकाळी 7.00 ते रात्री 9.00

5. सिध्देश्वर मंदिर,राजगुरूनगर
वेळ – सकाळी 9 ते रात्री 8

6. महादेव मंदिर, कासारवाडी वेळ – सकाळी 9 ते रात्री 9

7. शिवदत्त मंदिर, मासुळकर कॉलनी, पिंपरी -चिंचवड वेळ – सकाळी 9 ते रात्री 9

8. श्री तपनेश्वर महादेव मंदिर, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे वेळ – स. 9 ते सायं 8

9. महादेव मंदिर, स्वामी समर्थ शाळेजवळ, इंद्रायणी नगर भोसरी. वेळ – सकाळी 6 ते रात्री 9.00

10. श्री सिद्धेश्वर मंदिर, तपोधाम कॉलनी, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे. वेळ – सकाळी 8.30 ते सायं.8.00

11. श्री हरणेश्वर मंदिर, हरणेश्वर कॉलनी, तळेगाव दाभाडे
वेळ – सकाळी 10 ते सायं 7.00

12. धनेश्वर मंदिर, चिंचवडगाव
वेळ – सकाळी 9.00 ते रात्री 9.00

13. श्री .पंचलींग मंदिर जुन्नर, जिल्हा पुणे
वेळ – सकाळी 6.00 ते रात्री 8.00

सर्वसमावेशक ग्रंथ आणि साधनेला साहाय्यकारक सात्त्विक उत्पादने एकत्रित उपलब्ध !
या कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार, आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध असेल. ही अनमोल ग्रंथसंपदा जिज्ञासूंना ज्ञानार्जनासह साधनेसाठी मार्गदर्शन करणारी आहे. यासह गोमूत्र अर्क, जपमाळ, सात्त्विक अगरबत्ती, भीमसेनी कापूर, सात्त्विक अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शन कक्षांवर मिळतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी (7038713883) या क्रमांकावर संपर्क करावा.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026