ग्रंथ प्रदर्शनाला समाजातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुणे – महाशिवरात्रीला शिव देवतेविषयी धर्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊन धर्मशास्त्रानुसार आचरण करता यावे आणि महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा या उद्देशाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात या कालावधीत विविध प्रकारे धर्मपसार करण्यात आला.यामाध्यमातून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ व्याख्यान असे अनेक उपक्रम घेण्यात आले.यामुळे व्यापक धर्मप्रसारही झाला. पुणे शहरात 22 ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड येथे 25 ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सक्रीय सहभाग घेतला. कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद,बालसंस्कार, आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध करण्यात आली होती. ज्ञानार्जनासह साधनेसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनमोल ग्रंथसंपदेचा लाभ कक्षाला भेट दिलेल्या हजारो जिज्ञासूंनी घेतला. सनातन निर्मित पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शन कक्षांवर उपलब्ध करण्यात आली होती त्याचाही लाभ हजारो जिज्ञासूंनी घेतला.

काही प्रदर्शनस्थळी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. धनकवडी श्रीनगर कक्षावर खडकवासला मतदार संघाचे आमदार श्री. भीमराव (अण्णा) तापकीर यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश पवार आणि अन्य कार्यकर्तेही होते. कात्रज, काशी विश्वेश्वर कक्षावर माजी नगरसेविका सौ. वर्षा तापकीर यांनी भेट दिली.तसेच सनातनच्या 123 व्या समष्टी संत सौ.मनीषा पाठक यांनी ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शन कक्षांना भेटी दिल्या.
