पुणे प्रहार डेस्क – कोल्हापूर स्टेशन रोड जवळ एका हॉटेलमध्ये तुफान मारामारी झाल्याची पाहायला मिळाली. या मारामारीमुळे हॉटेलची तोडफोड झालेली आहे. तोडफोड झालेल्या प्रकरणामुळे 11 जणांवर शहापुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या मारामारीचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. हि घटना पाहताच अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहे. मारामारी करण्यामागील जर तुम्ही कारण जाणून घ्याल तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. अनेकदा आपण बाहेर खाण्यापिण्यासाठी जात असतो.
रात्रीच्या वेळी काही सोय नसल्यावर एखादा ढाबा मध्ये देखील खाद्यपदार्थ खात असतो, अशावेळी जर आपल्याला काही एखाद्या पदार्थ कमी आला तर वाद देखील होण्याची शक्यता असते. अशीच शक्यता यावेळी घडलेली आहे. खाण्याचे पदार्थ रोटी नसल्यामुळे हॉटेल मालक आणि अकरा तरुणांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.
या मारहाणीत तक्रारदार आदिती ढुमके , उत्तम आडुळकर , शोएब शेख गंभीरित्या जखमी झालेले आहेत. आरोपी विरोधात तक्रार देखील करण्यात आलेली आहे. यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आरोपी जेवणासाठी आले होते. जेवणात रोटीची मागणी केल्यामुळे ही घटना घडल्याचे दिसून आले.
हॉटेल मालकाने रोटी नसल्याचे सांगितल्या कारणाने संतापून चौघे आरोपीने हॉटेल मालक वेटर आणि त्यांच्या साथीदाराला मारायला सुरुवात केली व सोबतच त्यांच्या मित्रमंडळींना बोलवून हॉटेलची तोडफोड देखील केली. हा सगळा प्रसंग हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी पुढील तपासणीसाठी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले असून लवकरच आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील पोलिसांनी सांगितले.
रोटी न मिळाल्यामुळे झालेल्या या तुफान मारामारी चा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आहे, यापुढे हॉटेलमध्ये जाताना नेमके कसे वर्तन ठेवावे याचे भान देखील लोकांनी बाळगायला हवे तसेच ग्राहकांनी अशा प्रकारचा प्रकारचे वर्तन केल्यास आपल्या जीवावर देखील बेतू शकते, अशी चिंता हॉटेल मालकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे.