Pune Sex Racket : Viman Nagar ला Russian Girls च्या नावाखाली सुरु असलेलं रॅकेट पोलिसांनी कसं उलगडलं?

Pune Sex Racket : प्रहार डेस्क

मागच्या काही दिवसांपासून पुण्यातून येणाऱ्या बातम्यांचा मूड बदललाय. म्हणजे सुरुवातीला ट्रॅफिकच्या बातम्यांनी सुरुवात झाली, मग खून, गँगच्या बातम्या सुरू झाल्या आणि याच आठवड्यात बातमी आली ती पुण्यात उघडकीस आलेल्या एका सेक्स रॅकेटची.

विमान नगर आणि कोरेगाव पार्क हा पुण्याचा उच्च गृह भाग. बऱ्यापैकी फॉरेनर्स पुण्याच्या या भागात राहणं पसंत करतात. इथं उंच हॉटेल्स आहेत क्लब्स आहेत बड्या लोकांचा राबता आहे आणि दुर्दैवानं नजरेआड घडणारे गुन्हेही.

16 जानेवारीच्या रात्री याच दोन भागांमध्ये एक सेक्स रॅकेट उघड झालं. त्यातून पोलिसांनी दोन परदेशी मुलींना आणि एका भारतीय महिलेला सोडवलं. पण अगदी सुमडीत सुरू असलेल्या प्रकरणाची टीप पोलिसांना कशी लागली. परदेशी मुली या जाळ्यात कशा अडकल्या आणि पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस कसं आणलं तेच सांगणारा हा रिपोर्ट.

तर या सगळ्याची सुरुवात झाली पोलिसांना मिळालेल्या एका टीप पासून. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टीप मिळाली. कोरेगाव पार्क आणि विमानगर भागात हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची. एक रोहित नावाचा एजंट तिथल्या हॉटेल्समध्ये रशियन मुली पुरवतो. पूर्ण रॅकेट पुण्याच्या किंवा अगदी देशाच्या बाहेर असलेल्या व्यक्तींकडून मॅनेज होतं.

सगळी प्रोसेस ही ऑनलाईन चालते ऑनलाईन पैसे पाठवायचे मुली निवडायच्या आणि मग हायफाय एरियातल्या हायफाय हॉटेलमध्ये भेट ठरते. या टिपरनं पोलिसांना एक नंबरही दिला होता हा नंबरच हे प्रकरण खोदून काढण्यात महत्त्वाचा ठरला. कारण याच जोरावर पोलिसांनी रचला ट्रॅप. या ट्रॅप मध्ये सगळ्यात आधी एका माणसाला बनावट ग्राहक बनवलं गेलं मग त्यानं पोलिसांना टीपमध्ये मिळालेल्या नंबरवर व्हाट्सअप मेसेज केला. तो नंबर होता रोहित नावाच्या एका एजंटचा. या बनावट ग्राहकाने रोहितशी बोलणं वाढवलं आणि त्याला थेट फॉरेनर मुली उपलब्ध होतील का? असं विचारलं.

रोहित या जाळ्यात अलगद सापडला आणि त्यानं त्या बनावट ग्राहकाच्या फोनवर दोन परदेशी मुलींचे फोटो पाठवले. त्यांचा पंधरा हजार रुपये असा दरही सांगितला तेव्हा या बनावट ग्राहकाने मुलींना प्रत्यक्ष बघूनच पैसे देईल अशी अट टाकली. मग रोहितनं या ग्राहकाला सांगितलं विमान नगरच्या हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनलमध्ये दोन मुली आहेत. त्यातली एक निवडा आणि पैसे द्या नाहीतर कोरेगाव पार्कच्या एका हॉटेलमध्ये एक मुंबईत राहणारी राजस्थानी अभिनेत्री सुद्धा आहे.

त्याच्या या मेसेज वरून तो जाळ्यात पूर्णपणे अडकल्याची पोलिसांना खात्री झाली आणि मग सुरू झाला ट्रॅपचा दुसरा अंक. एक्झिक्युशन पोलिसांनी या बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवायचं ठरवलं. त्याच्यासोबत पंधरा हजार रुपयांची कॅश दिली या नोटांवर खुनाही करून दिल्या.

सगळं सुरळीत होतंय की नाही हे पहायला एक महिला आणि एका पुरुष पंचाची नेमणूक केली. एका बाजूला हा बनावट ग्राहक हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनलमध्ये पोहोचला आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची टीम अलर्ट वर राहिली. रोहितनं या ग्राहकाला दोन रूम नंबर सांगितले होते. 411 आणि 412 हा माणूस हॉटेलमध्ये पोहोचला त्यानं मॅनेजरला ओळखपत्र दाखवून रूम नंबर 412 मध्ये जायचं आहे असं सांगितलं. तर रूममध्ये पोहोचल्यावर तिथे एक परदेशी मुलगी होती पण यानं दुसऱ्या मुलीकडे जायचा आग्रह धरला. तिनं त्याला 411 नंबरच्या रूममध्ये जायला सांगितलं. हा तिथे पोहोचला तर तिथं रोहितनं सांगितलेली दुसरी मुलगी होती.

या बनावट ग्राहकानं त्या मुलीला ₹15000 दिले आणि त्याच वेळी पोलिसांना एक मेसेजही पाठवला. अलर्टवर असलेले पोलीस याच मेसेजची वाट बघत होते. त्यांनी लगेचच हॉटेलमध्ये एंट्री मारली आणि पुढच्या काही क्षणात रूम नंबर 411 च्या दारावर थाप पडली.

बनावट ग्राहक बनून गेलेल्या माणसानं लगेचच दार उघडलं. पोलिसांच्या पथकातल्या महिला आणि पंच रूममध्ये गेले. त्या मुलीला ताब्यात घेतलच पण तिची पर्सही चेक केली. तिच्या पर्समध्ये पोलिसांना पंधरा हजार रुपये सापडले. ज्यावर पोलिसांनी केलेल्या खुणाई होत्या. ती हीच मुलगी असल्याची अधिकृत खात्री करून घेतली आणि लागलीच रूम नंबर 412 चही दार वाजलं. आणि तिथूनही एका परदेशी मुलीला ताब्यात घेण्यात आलं.

या मुलींशी रशियन म्हणून चर्चा सुरू असली तरी त्या मूळच्या उज्बेकिस्तानच्या होत्या. त्या दोघा मुलींना ताब्यात घेतलं म्हणजे पोलिसांचं ऑपरेशन संपलं असंही नव्हतं. कारण पोलिसांची एक टीम कोरेगाव पार्कच्या हॉटेल O मध्ये पोहोचली होती. रोहितनं त्या बनावट ग्राहकाला माहिती देताना इकडच्या हॉटेलमध्ये मुंबईत राहणारी राजस्थानी अभिनेत्री असल्याचेही सांगितलं होतं. त्याच माहितीच्या जोरावर पोलिसांनी कोरेगाव पार्कच्या हॉटेलमधून या अभिनेत्रीलाही सोडवलं. पण या तिन्ही मुली वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये आल्या कशा? तर दोन उजबेकी मुलींनपैकी एक मुलगी नोव्हेंबर 2023 मध्ये तर दुसरी मुलगी डिसेंबर 2023 मध्ये टूरिस्ट विझावर भारतात आली.
मग या दोघींना भेटला एक मुलगा ज्यानं त्याची वेगवेगळी नाव सांगितली. इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन संन्यासी. त्यानंच या दोघींना या कामात आलात. तर भरपूर पैसे मिळतील असं आमिष दाखवलं. या दोघीही त्याला बोलल्या पण प्रत्यक्षात त्यांना या कामाचे प्रत्येकी चार हजार रुपये देण्यात येणार होते. बाकी सगळे पैसे खाणार होते इरफान आणि रोहित नावाचे दोन एजंट.

उजबेकी मुलींना पैशांचा आमिष दाखवून गिऱ्हाईकांना या रशियन मुली आहेत असं भासवून हा सगळा उद्योग सुरू होता. पण दुसऱ्या बाजूला याच जाळ्यात एक राजस्थानी अभिनेत्री ही ओढली गेली होती. राजस्थानमधून मुंबईत आल्यावर तिनं काही बोल्ड व्हिडिओजमध्ये काम केलं होतं पण त्यानंतर तिला काम मिळणं बंद झालं.

तेव्हा ती पुण्यात आली इथं कबीर नावाच्या एका एजंटनं तिला एका वेळचे ₹15000 मिळतील असं सांगून या कामात आणलं आणि रोहित इरफानच्या नेटवर्कशी जोडून दिलं. माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांमध्ये असं सांगण्यात येतंय की या महिला वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात याच गोष्टी करत होत्या. पण पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे त्या ठिकाण बदलत राहायच्या. तशाच त्या पुण्यात आल्या आणि पोलिसांना मिळालेल्या एका टीपमुळे यांचा प्लॅन फिसकटला. पण हे जाळं किती खोलवर रुजलं आहे हे पुढे आणायचं असेल तर पोलिसांना या एजंट लोकांना ताब्यात घ्यावं लागेल तेव्हाच उलगडेल या रॅकेटचं कोडं आणि कदाचित सुटेल पुण्याला पडलेला गुन्हेगारीचा विळखा.