वनप्लस सादर करत आहे वनप्लस 13 सीरिजसाठी 180 दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन…

वनप्लस हा जागतिक तंत्रज्ञान ब्रँड असून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पूर्वी वनप्लस 13 सीरिज डिव्हाइस खरेदी केलेल्या वापरकर्त्यांना अंतिम मनःशांतीची हमी मिळणार आहे, जी आहे – असंभवनीय परिस्थितीमध्ये नवीन वनप्लस 13 किंवा वनप्लस 13आर मध्ये हार्डवेअरची समस्या दिसून आली तर खरेदी केल्याच्या तारखेनंतर पहिल्या 180 दिवसांच्या आत विनामूल्य फोन बदलून मिळणार आहे. या अप्रतिम व अशा प्रकारच्या पहिल्या प्लॅनमुळे त्यांना ताबडतोब विनामूल्य डिव्हाइस बदलून मिळणार आहे.

रॉबिन लियू, सी.ई.ओ, वनप्लस इंडिया म्हणाले की, “आम्ही अभिमानाने हा प्रोटेक्शन प्लॅन सादर करीत आहोत आणि त्यायोगे वापरकर्त्यांचा अनुभव आणखी वाढवित आहोत. वनप्लस 13 सीरिजसाठी 180 दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन आमच्या उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर आणि वापरकर्त्यांसाठी घेत असलेल्या काळजीवर आमचा विश्वास दर्शवत आहे आणि स्थानिक ग्राहकांसाठी सेवेचा दर्जा सातत्याने सुधारत आहे.”

ब्रँडच्या हमीद्वारे प्रेरित एक उपक्रम

 वनप्लसची आपल्या वापरकर्त्यांना प्राधान्य देण्याची बांधिलकी या उद्योगातील अग्रगण्य उपक्रमातून पहायला मिळत असून स्क्रीन, बॅक कव्हर, बॅटरी आणि मदरबोर्ड इत्यादींसह सर्व डिव्हाइस घटकांना सामील केले गेले आहे. 180 दिवसांच्या कालावधीत हार्डवेअरच्या दर्जाची कोणतीही समस्या दिसून आली, तर ग्राहकांना एकवेळ डिव्हाइस बदलण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे दुरुस्तीला पूर्णपणे डावलले जाते आणि म्हणून एक चिंतामुक्त अनुभव नक्कीच मिळतो.

एक्सचेंज प्रक्रिया सोपी आणि वापरकर्त्यास अनुकूल आहे. ग्राहक कोणत्याही अधिकृत सेवा केंद्राला भेट देऊन डिव्हाइस बदली करून मिळण्याच्या पात्रतेची पुष्टी करून घेऊ शकतात. दिनांक 10 जानेवारी ते दिनांक 13 फेब्रुवारी दरम्यान वनप्लस 13 सीरिज खरेदी करणाऱ्यांना ही सेवा विनामूल्य देऊ केली जाणार आहे. या कालावधीनंतर, ही प्रीमियम सेवा वैकल्पिक पेड प्रोटेक्शन प्लॅन द्वारे उपलब्ध असेल. हा प्लॅन वनप्लस 13 साठी रु. 2599 आणि वनप्लस 13 आर साठी रु. 2299 किंमतीत उपलब्ध असून तो अतिरिक्त तीन महिन्यांसाठी सेवा प्रदान करणार आहे आणि त्यामुळे मनःशांती प्रदान करणार आहे.

भारतातील नवोपक्रम आणि सेवा उत्कृष्टता वाढविणे

 “180-दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन” वनप्लसच्या भारतातील प्रोजेक्ट स्टारलाइटचा एक भाग आहे. हा प्रोजेक्ट डिव्हाइसचा टिकाऊपणा वाढविण्याचे, अपवादात्मक सेवा देण्याचे आणि विशेषत: भारतीय बाजारपेठेसाठी अनुकूल वैशिष्ट्ये तयार करण्याकरिता या क्षेत्रात भविष्यात गुंतवणूक करण्याचे एक धोरणात्मक दृष्टीकोन आहे. वनप्लसने आपली सेवा कार्यक्षमता आणि दर्जा वाढविण्यासाठी आपल्या सेवा नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे आणि भारतात विक्रीनंतरच्या सेवेचे समर्थन वाढविले आहे. हे सेवा केंद्रांची संख्या वाढवून आणि सेवा प्रक्रिया इष्टतम करून साध्य केले आहे. प्रोजेक्ट स्टारलाइटच्या माध्यमातून वनप्लस ग्राहकांना अधिक जलद प्रतिसाद, जास्त चांगली पारदर्शकता, वाढीव वापरकर्ता शिक्षण कार्यक्रम आणि अधिक सोयीस्कर स्टोअर्सच्या आत अनुभव देणे सुरू ठेवणार आहे.

वनप्लस 13 सीरिज: कामगिरी आणि विश्वासार्हतेवर भरवसा

वनप्लस 13 सीरिजला काल रात्री विंटर लाँच इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले. वनप्लस 13 आणि वनप्लस 13आर या दोन्ही फोन्स मध्ये वाढीव इमेजिंग, अत्याधुनिक डिझाइन, प्रगत एआय आणि दैनंदिन वापरासाठी तयार केलेली विश्वासार्ह कामगिरी मिळते. हे डिव्हाइसेस नवीनतम स्नॅपड्रॅगन मोबाइल प्लॅटफॉर्म द्वारे संचालित आहेत आणि ऑक्सिजनओएस 15 सह त्यांना इष्टतम केले गेले आहे आणि म्हणून हे डिव्हाइसेस सुलभ मल्टीटास्किंग, गेमिंग आणि वापरकर्ता अनुभव प्रदान करून उत्पादकतेला आणि कल्पकतेला प्रोत्साहन देतात. दोन्ही मॉडेल्सना भक्कम ट्रिपल-कॅमेरा सिस्टम ने सुसज्ज केले गेले असून ते वापरकर्त्यांना कोणत्याही वातावरणांत व्यावसायिक दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ टिपू देतात. वनप्लस 13 सीरिज मध्ये सुधारित टिकाऊपणा आणि सुरेख डिझाइन देण्यात आले असून ते आरामदायक, ऐटबाज (स्टायलिश) आणि लवचिक पकड प्रदान करते. वनप्लस 13 सीरिजला “180-दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन” ने समर्थन देण्यात आले आहे आणि बाजारात एक स्मार्ट, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक फ्लॅगशिप पर्याय आहे.

अस्वीकृती : या बदलण्याच्या प्रोटेक्शन प्लॅनचे विशिष्ट तपशील आणि अटी वनप्लस रेड केबल क्लबने प्रकाशित केलेल्या अंतिम माहितीच्या अधीन आहेत. वनप्लस ने या प्रोटेक्शन प्लॅनच्या अंतिम स्पष्टीकरणाचे अधिकार राखून ठेवले आहेत.