लंडनस्थित अनिल अगरवाल रिव्हरसाइड स्टुडिओ ट्रस्टला लोकसभा अध्यक्षांची भेट
राष्ट्रीय, 10 जानेवारी: माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांनी 100 वर्षे जुन्या रिव्हरसाइड स्टुडिओ ट्रस्टला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम केंद्र बनवण्याच्या वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.
टेम्स नदीच्या उत्तरेकडील काठावर स्थित या सुप्रसिद्ध जागतिक कला केंद्रात बोलताना श्री. बिर्ला म्हणाले की, हा स्टुडिओ जगभरातील कलाकार आणि सादरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. सगळ्या खंडांना कला, संस्कृती आणि नाविन्यपूर्णता यांनी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत वेदांत समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अगरवाल आता या नामांकित रिव्हरसाइड स्टुडिओचे सर्वेसर्वा असणार आहेत.
“अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अनिल अगरवाल यांचे मी आभार मानतो. जगभरातील कलाकारांना येथे लंडनमध्ये त्यांच्या भागातील संस्कृती आणि कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल,” असे श्री बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितले. “रिव्हरसाइड स्टुडिओ ट्रस्ट हे अशा कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी जागतिक मंच बनेल.”
श्री. बिर्ला यांनी कला, संस्कृती आणि नाविन्यपूर्णतेचा अखंड समावेश असलेल्या आणि विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाचे प्रतीक म्हणून रिव्हरसाइड स्टुडिओचे कौतुक केले.
आपले मनोगत व्यक्त करताना वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल म्हणाले, “रिव्हरसाइड स्टुडिओज येथे माननीय श्री. ओम बिर्ला यांचे स्वागत करणे हा आमच्यासाठी सन्मान होता. त्यांचा दृष्टीकोन आणि नेतृत्व आम्हाला केवळ आर्थिक सहयोगातून नव्हे तर सांस्कृतिक वारसा जपत आणि साजरा करत भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरित करते.”
माननीय लोकसभा अध्यक्षांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंगणवाड्यांना नंदघरांमध्ये रूपांतरित करून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांत समूह करत असलेल्या अग्रणी प्रयत्नांचेही कौतुक केले.
“नंदघर मुलांना विनामूल्य शिक्षण आणि पोषक आहार देतात. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अशा उपाययोजना महत्त्वाच्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
रिव्हरसाइड स्टुडिओच्या या सुप्रसिद्ध वास्तूच्या गाईडेड टूरने या भेटीचा समारोप झाला. श्री. ओम बिर्ला यांनी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या या स्थळाच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले. सांस्कृतिक पातळीवरून राजनैतिक संबंध सुधारणे आणि लोकांमधील भावसंबंध अधिक दृढ करणे यात अशी सांस्कृतिक स्थळे खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली.
अनिल अगरवाल रिव्हरसाइड स्टुडिओला श्री. ओम बिर्ला यांनी दिलेली भेट ही भारत आणि युनायटेड किंगडममधील बळकट आणि विकसित होत असलेल्या संबंधांचे प्रतीक आहे. ही भेट दोन्ही राष्ट्रांच्या सांस्कृतिक पूल तयार करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला अधोरेखित करत परस्पर समृद्धतेच्या भविष्याची पायाभरणी करते.