पुणे प्रहार डेस्क – तीन ते चार दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये सोशल मीडियावर कोयता हातामध्ये घेऊन फोटो पोस्ट केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा पुन्हा पुण्यात एक नवीन घटना समोर आलेली आहे. पुण्यातील या कोयता गॅंग ने पुन्हा राडा करायची संधी सोडली नाहीये.
या कोयता गँगने तरुणाच्या हाताचा पंजा वेगळा केलेला आहे. हि घटना बिबवेवाडीमध्येघडली आहे. कोयता यांच्या टोळीने तरुणावर जीवा हल्ला केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेले आहे.
कोयता गॅंग ने केलेल्या हल्ल्यामुळे या तरुणाला आपल्या हाताचा पंजा गमवा लागलेला आहे. या घटने प्रकरणी या तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. या हल्ल्यामध्ये पीयूष पाचकुडवे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात सागर सरोज आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणासह २ जणांना ताब्यात घेतले आहे.
हा सगळा प्रकार सोमवारी चारच्या दरम्यान घडला. तक्रार आणि त्याचा मित्र पियुष यांना आरोपीकडून भेटायला बोलावले गेले होते. पूर्वी यांच्यामध्ये काहीतरी वाद झाले होते आणि म्हणूनच या वादाचा बदला घेण्याकरिताच आरोपीने या दोघांना बोलावले होते, अशावेळी पियुष च्या हातावर आरोपीने कोयता मारला आणि कोयता मारल्यामुळेच पियुषचा हात पंजा पूर्णपणे वेगळा झाला.
या जीवघेण्या हल्ल्यामध्ये पियुष गंभीर जखमी झालेला आहे. पियुषला त्वरित पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे तसेच डॉक्टर शस्त्रक्रिया करून पियुषचा हात जोडण्याचा प्रयत्न देखील करत आहे परंतु घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे म्हणूनच आरोपीला त्वरित अटक केले गेलेले आहे. या घटने अंतर्गत दोन जणांवर अमानुष मानवी हत्या हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.