पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातील नागरिक देखील त्रस्त आहे, अशावेळी पोलीस प्रशासन देखील हालचाल करताना दिसून आलेले आहे. पोलिसांची प्रतिमा उजळ ठेवण्याच्या हेतूने पुणे शहरातील मोठे मोठे पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करायला सुरुवात झालेल्या आहेत. या प्रशासकीय कारणांमुळे झालेल्या बदलांमुळे लवकरच पुणे शहरामध्ये महत्त्वाचे बदल दिसून येतील अशा चर्चा देखील रंगत आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील सहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर प्रशासकीय कारण असून तात्पुरती नेमणूक करण्यात असल्याचे देखील जाहीर करण्यात आलेले आहे, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेश पत्रकामध्ये म्हटले आहे.
पुणे शहरात अंतर्गत झालेल्या बदली मध्ये मोठे मोठे अधिकाऱ्यांचे नाव आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांची बदली वेगवेगळ्या विभागामध्ये देखील करण्यात आलेली असून भविष्यात या विभागांमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतील असे देखील सांगण्यात आले आहेत.
हे नावे पुढीलप्रमाणे
विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा, १ खडकी विभाग, अनुजा अजित देशमाने (खडकी विभाग ते फरासखाना विभाग) , अनुराधा विठ्ठल उदमले (विशेष शाखा २ ते हडपसर विभाग) , नुतन विश्वनाथ पवार (फरासखाना विभाग ते विशेष शाखा २) , अतुलकुमार यशवंत नवगिरे (वाहतूक शाखा ते विशेष शाखा १) , अश्विनी गणेश राख ACP Ashwini Rakh (हडपसर विभाग ते वाहतूक शाखा)
त्याचबरोबर १० सहायक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
ही सारी माहिती पुणे शहर पोलीस दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेश पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. लवकरच हे सारे बडे अधिकारी आपल्या विभागाचा कार्यभार हातातील. या बदल्यांमुळे लवकरच पुण्यात सकारात्मक बदल दिसून येतील अशी आशा देखील पुणे शहरातील नागरिक करत आहेत.