32 वर्षापासून छोटू बाबाने केली नाही अंघोळ…” या ” साधूची होतेय सोशल मीडियावर चर्चा, चला जाणून घेऊन नेमकी आहे तरी कोण ?

पुणे प्रहार डेस्क – प्रयागराज महाकुंभमेळा लवकरच सुरू होणार आहे. प्रयागराजला भारताच्या व जगभरातील विविध भागातून साधुसंत यायला सुरुवात झालेली आहे. बारा वर्षानंतर हा कुंभमेळा वेगवेगळ्या ठिकाणी रचला जातो. हिंदुधर्म संस्कृतीमध्ये या कुंभमेळ्याला खूपच महत्त्व आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पंथातील साधूंची हजेरी आवर्जून असते.

अनेकदा या कुंभमेळा मध्ये उपस्थित झालेल्या साधू संतांची चर्चा देखील होत असते, अशीच एक चर्चा यंदा प्रयागराज येथे महा कुंभ मेळा मध्ये आलेल्या साधूची होत आहे. या साधूचे नाव “छोटू बाबा” आहे. हे 32 वर्षाचे आहे. सर्वात महत्त्वाचे आश्चर्य म्हणजे गेल्या 32 वर्षापासून छोटू बाबा ने आंघोळ केली नाही आणि म्हणूनच सध्या सोशल मीडिया व माध्यमाने या छोटू बाबा बद्दल अनेक चर्चा देखील रंगत आहेत.

उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराज कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ही तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. या कुंभमेळ्याला जगभरातून विविध संत येत आहेत, अशा वेळी आसाम भागातून कामाख्यापीठातून 57 वर्ष असलेले गंगापूर महाराज देखील आलेले आहे. गंगापूर महाराज यांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. तीन फूट आठ इंच उंची असलेल्या बाबांचा सगळीकडे बोलबाला दिसून येत आहे तसेच या बाबांना छोटू बाबा असे देखील म्हटले जात आहे.

गेल्या 32 वर्षापासून या छोटू बाबांनी आंघोळ केली नाही असा दावा देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. संगमावरच बाबा यांनी आपल्या तंबू लावला आहे. गंगापुरी महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असून त्यांचा आशीर्वाद देखील घेत आहेत.

गेल्या 32 वर्षापासून आंघोळ न करण्याचे कारण विचारले असता त्यांनी नवस केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची एक इच्छा पूर्ण झाली नाही आहे म्हणून त्यांनी आंघोळ केली नाही. ज्या दिवशी इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी गंगेच्या पाण्याने ते आंघोळ करतील असे देखील म्हणाले. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे यंदाच्या प्रयागराज महाकुंभ मेळाव्याच्या वेळी छोटू बाबा त्यांच्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर छोटू बाबा यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलेली आहे.