पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा, खाताना सांभाळून खा पिझ्झा नाहीतर…, मॅनेजर विरोधात नोंदवली तक्रार

पुणे प्रहार डेस्क – आपल्यापैकी अनेक जण बाहेर गेल्यावर तसेच घरी जंक फूड खात असतो, त्यातील पिझ्झा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. परंतु आता हा पिझ्झा खाताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. चक्क पिझ्झा खाताना त्या पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडल्याची घटना घडलेली आहे म्हणूनच फूडप्रेमी मध्ये आता चिंताजनक वातावरण देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पिझ्झा खात असताना चाकूचा तुकडा टोचल्याने ही घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. या घटने अंतर्गत तक्रारदार अरुण कापसे यांनी जय गणेश साम्राज्य मधील डोमिनोझ पिझ्झा विरोधात तक्रार देखील नोंदवली आहे व त्याचबरोबर या सेंटरमधून कोणीच पिझ्झा खरेदी करू नये असे नागरिकांना विनंती देखील केलेली आहे. पिझ्झा खात असताना चाकूचा तुकडा सापडल्याने अरुण यांना किरकोळ जखम देखील झाली आहे.

लहान मुलांना पिझ्झा खाण्याचा मोठा छंद असतो, अशावेळी जर त्यांच्या खाण्यामध्ये देखील टोकेरी वस्तू सपडल्यास भविष्यात गंभीरजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही घटना शुक्रवारी स्पाईन रोड येथे जय गणेश साम्राज्य डॉमिनोज पिझ्झा मधून अरुण यांनी पिझ्झा ऑर्डर केला होता त्यासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून 596 रुपये दिले होते परंतु हा पिझ्झा घरी आला. पिझ्झा खात असताना चाकूचा तुकडा पिझ्झा खाताना जिभेला लागल्यामुळे हा सगळा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

ही सारी माहिती अरुण कापसे यांनी दिली त्यानंतर अरुण यांनी डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला देखील ही माहिती कळवली. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली परंतु त्यांनी पाठवलेले फोटोज कुठेही सोशल मीडियावर पोस्ट करू नये यासाठी मॅनेजरने अरुण कापसे यांच्या घरी धाव घेतली व विनंती देखील केली. अरुण यांनी जय गणेश साम्राज्य येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटर मधील पिझ्झा कोणीही खाऊ नये, असे नागरिकांना आवाहन देखील केले. भविष्यात तुम्ही देखील पिझ्झा खाताना योग्य ती काळजी घ्या अन्यथा तुमच्या जीवावर बेतू शकते.