जानेवारीच्या “या” तारखेला भारतात लॉन्च होतोय नवीन स्मार्टफोन, हाय लाईफ टाईम असलेली बॅटरी आणि बदलणारा रंग… या चर्चेला आले उधाण !

पुणे प्रहार डेस्क – वर्ष 2025 च्या सुरुवातीलाच अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये हालचाली दिसल्या. अनेक नवीन कार मॉडेल, बाईक , आता मोबाईल फोन देखील नव्याने लॉन्च होत आहेत. मोबाईल फोन इंडस्ट्री मध्ये नवीन स्मार्टफोन्स लॉन्च झाल्याने अनेक मोबाईल फोन चाहता प्रेमींना वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी मिळालेली आहे परंतु तुम्हीच देखील स्मार्टफोन लवर असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जानेवारी महिन्याच्या या तारखेला भारतामध्ये नवीन मोबाईल फोन लॉन्च होणार आहे.

या मोबाईलच्या अंगी असणाऱ्या विविध स्पेसिफिकेशन मुळे व हाय क्वालिटी फीचर्स मुळे तुम्हाला वेगवेगळ्या एप्लीकेशन तर वापरता येणार आहे पण त्याचबरोबर हाय लाईफ टाईम बॅटरी मुळे तुमचा मोबाईल फोन जास्त काळ चार्ज देखील राहणार आहे. या बॅटरीच्या फीचर्स मुळे तुम्ही तीन ते चार दिवस पेक्षा जास्त मोबाईल फोन कुठेही घेऊन जाऊ शकता.. चला तर मग जाणून घेऊया हा नेमका फोन आहे तरी कुठला की ज्यामुळे भारतात या फोनच्या चर्चेला उधाण आलेले आहे..

भारतामध्ये जानेवारी महिन्याच्या या तारखेला

Realme 14 Pro+ Smartphone हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे गेल्यावर्षी 2024 मध्ये देखील अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर असलेले मोबाईल फोन लाँच केले होते परंतु रियल मी चा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या चाहता वर्गाच्या वापरामुळे रियल मी देखील वेगवेगळे वर्जन असलेले प्रॉडक्ट भारतामध्ये लॉन्च करत असते. नुकतेच जानेवारी महिन्याच्या या तारखेला रियल मी स्मार्टफोन लॉन्च होणार आहे आणि म्हणूनच या मोबाईल फोनवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आतापर्यंत या मोबाईल फोन नाही हाय क्वालिटी कॅमेरा फीचर्स दिल्यामुळे ऑनलाइन लाँच झाल्यानंतर काही काळातच या फोनची खरेदी विक्री बंद झाली होती.

रियल मी कंपनीने ग्राहकांना परवडणारे किंमत हाय क्वालिटी फीचर्स यामुळे स्वतःचे वेगळेपण आतापर्यंत मार्केटमध्ये सिद्ध केलेले आहे म्हणूनच ग्राहक वर्ग देखील डोळे बंद करून रियल मी मोबाईल फोन विकत घेत असतो.

रियल मी प्रो सध्या चीनमध्ये लॉन्च झालेला असून लवकरच भारतामध्ये देखील हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये 16 जानेवारीला लॉन्च होणार आहे. या मोबाईल फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रंग बदलणारे बॅक डिझाईन असणार आहे, त्याचबरोबर जेव्हा 16 अंशापेक्षा तापमान कमी असते अशावेळी या फोनचा रंग आपोआप बदलणार आहे या आगळ्यावेगळ्या फीचर्समुळे या फोनबद्दल चर्चा रंगलेली आहे.

Realme 14 Pro+ स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

1- डिस्प्ले- या स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा 1.5K कर्व्ह AMOLED डिस्प्ले
2800×1272 पिक्सेल रिझोल्युशन
120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट
1500 nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट
Qualcomm चा स्नॅपड्रॅगन 7s Gen तीन प्रोसेसर
12 जीबी+256 जीबी स्टोरेज
12GB+512GB स्टोरेज

कॅमेरा- रियलमी 14 Pro+ स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल सोनी IMX896 प्रायमरी सेन्सर

50 मेगापिक्सल अल्ट्राव्हाड अँगल लेन्स देखील उपलब्ध असून जी 3x झुम सपोर्ट

32 मेगापिक्सलचा कॅमेरा

बॅटरी- 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट

6000 mAh क्षमतेची बॅटरी

इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर IP69,IP68 आणि IP66 रेटिंग आहे.

स्टेरिओ स्पीकर्स फीचर्स

Realme 14 Pro भारतामध्ये चार रंगात उपलब्ध होणार आहेत . भारतामध्ये बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक या दोन कलर व्हेरियंटमध्ये आणले जाणार आहे.

इतकेच नाही तर या लाईन अप मधील जगातील पहिले थंड आणि रंग बदलणारे डिझाईन व तीन प्रकारचा फ्लॅश लाईटसह ही सिरीज आणली जात आहे.

चीनमध्ये काही दिवसांपूर्वीच हा मोबाईल फोन लॉन्च करण्यात आलेला असून या मोबाईल फोनची भारतीय चलनातील किंमत 30 तीस हजार पाचशे रुपये इतकी आहे. भारतामध्ये हा मोबाईल फोन 16 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे.