पुणे प्रहार डेस्क – असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं प्रेम करत असताना प्रियकर – प्रेयसी एकमेकांना वचन देतात. खऱ्या प्रेमाच्या नावाखाली दिवसेंदिवस फसवणुकीच्या गोष्टी घडत आहेत. प्रियकर प्रेयसीला फसवतो किंवा प्रेयसी प्रियकराला फसवून पळून जाते, अशा विविध घटना सध्या सोशल मीडियावर आपल्याला दिसून येत आहेत अशीच एक घटना घडली आहे. लग्नाचे व व्यवसाय करण्याचे आम्हीच दाखवून आपल्या प्रेयसीला फसवले आहे. या प्रियकराने फक्त फसवलेच नाही तर 32 लाख रुपये देखील तिच्याकडून उकळून पळून गेलेला आहे.
महिलेला लग्नाचे व व्यवसायाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने 32 लाख व 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे त्याचबरोबर आरोपी पैकी एकाने या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे देखील उघडकीस आलेले आहे. या घटनेमुळे आजूबाजूला भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे.
हा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडलेला आहे. एप्रिल 22 ते 24 यादरम्यान हे घटना घडली आहे. गेल्या दोन वर्षापासून महिला व दोन आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. ही महिला आणि दोन आरोपी हे एकाच इमारतीत राहत होते परंतु गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी तसेच लग्न करेल असे आमिष दाखवून या आरोपींनी महिलांकडून पैसे घेण्याचे ठरवले. अनेकदा कॅश व ऑनलाइन माध्यमातून महिलेने आरोपीला पैसे दिले आहे.
एका आरोपीने तर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे वारंवार पैसे पुन्हा मागितल्यावर मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील आरोपींनी दिल्यामुळे शेवटी महिलेने या दोघां विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणाची सखोलपणे चौकशी करत आहेत. या घटने संबंधित पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण करत आहेत.