- पॅटर्न रेकग्निशन आणि ऑटोमेटेड रुल जनरेशन यांच्या एकत्रित शक्तीचा उपयोग करून, हे सोल्युशन सुरक्षा वाढवते आणि सुरक्षित मेसेजिंगचा अनुभव मिळवून देते.
- स्पॅम म्हणून ओळखल्या गेलेल्या मेसेजेसना “सस्पेक्टेड स्पॅम” म्हणून टॅग केले जाईल आणि युजर्सना तात्काळ इशारा दिला जाईल.
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने आपल्या युजर्सना स्पॅमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचे पुढचे पाऊल उचलले आहे. आजपासून ही कंपनी एक स्पॅम मॅनेजमेंट सोल्युशन आणत आहे जे एआय आणि एमएलच्या आधारे काम करते. हे नवे सोल्युशन एका मशीन बेस्ड ऑटोमेटेड सोल्युशनमार्फत संभाव्य सपान मेसेजेस ओळखून त्यांना फ्लॅग करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यामुळे वी युजर्सना सुरक्षित आणि अनावश्यक मेसेजेसचा कचरा जमा न होता मोबाईलचा उत्तम अनुभव घेता येईल. सुरुवातीच्या तपासणी टप्प्यापासून या सोल्युशनने २४ मिलियनपेक्षा जास्त स्पॅम मेसेजेस याआधीच फ्लॅग केले आहेत.
स्पॅम मेसेजेसचे प्रमाण खूप वाढत आहे, गैरव्यवहारांची, फसवणुकीची सुरुवात या मेसेजेसमधून होत असते, वी चे स्पॅम एसएमएस सोल्युशन अनावश्यक आणि संभाव्य धोकादायक टेक्स्ट लगेचच ओळखून ग्राहकांना सुरक्षित ठेवेल.
या नवीन घडामोडींविषयी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीटीओ श्री जगबीर सिंग यांनी सांगितले, “आज जास्तीत जास्त ग्राहक डिजिटल कम्युनिकेशनचा लाभ घेत आहेत, त्यामुळे दुसरीकडे एसएमएसमधून स्पॅम्स आणि संभाव्य फसवणुकीच्या शक्यता देखील बळावल्याचे आमच्या लक्षात आले आहे. आमचे एआय–पॉवर्ड स्पॅम डिटेक्शन तंत्रज्ञान स्वतः पुढाकार घेऊन, रिअल–टाइम संरक्षण पुरवते आणि ग्राहकांच्या सुरक्षेप्रती आमची बांधिलकी दर्शवते. हे धोके पुरेपूर ओळखून, त्यांच्या विरोधात ग्राहकांना सक्षम करण्यावर वी भर देत आहे, या माहितीच्या बळावर ग्राहकांना अधिक सुरक्षित मोबाईल अनुभव मिळवता येईल.”
ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांना मिळणारे अनुभव यांच्याप्रती व्यापक बांधिलकीचा एक भाग म्हणून वी व्हॉइस कॉल्ससह सर्व स्पॅमवर पूर्ण नियंत्रण ठेवून शकतील अशी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी सातत्याने काम करत आहे, अनावश्यक कॉल्सपासून युजर्स पूर्णपणे सुरक्षित राहावेत हा यामागचा उद्देश आहे. सध्या उपलब्ध असलेली अनेक वेगवेगळी सोल्युशन्स आणि प्रथा, (स्पॅम कन्टेन्ट, पाठवणाऱ्याचा नंबर, तारीख यांचे ऑटोमॅटिक पिक-अप सक्षम करून तसेच ब्रँड मेसेजेसमध्ये युआरएल व्हाईटलिस्टिंग करून स्पॅम तक्रारी फाईल करणे सोपे करण्यासाठी मोबाईल-ऍप युआरएल साधेसोपे करण्यासह) यांच्या बरोबरीने हे उपाय केले जात आहेत. युसीसी डिटेक्शनच्या बरोबरीने वी ग्राहकांकडून मिळणारे प्रतिसाद आणि तक्रारी यांचा देखील उपयोग करत आहे. युसीसीमध्ये बल्क कॉल पॅटर्न्स लक्षात येतात आणि गैरवापर टाळण्यासाठी त्यांच्या वापरावर मर्यादा घालता येतात.
ग्राहक जागरूकतेचे महत्त्व समजून घेऊन वी नियमितपणे ग्राहक जागरूकता मोहीम देखील राबवत आहेत, त्यामुळे युजर्सना फिशिंगचे प्रयत्न ओळखता येतात, स्पॅमची सूचना देता येते आणि एकंदरीत काळजी घेता येते.
वीचे एसएमएस स्पॅम सोल्युशन कसे काम करते
- रिअल–टाइम ऍनालिसिस: ही यंत्रणा एआय अल्गोरिदमचा वापर करून येणाऱ्या एसएमएस मेसेजेसचे विश्लेषण करते, त्यासाठी हजारो उदाहरणांचा अभ्यास केलेला असतो, संभाव्य धोके ओळखले जातात, यामध्ये फसवणुकीच्या लिंक्स, अनधिकृत प्रमोशन्स आणि ओळख दर्शवणारी माहिती चोरीचे प्रयत्न यांचा समावेश असतो. सातत्याने निगराणी ठेवल्याने संशयास्पद हालचालींविरोधात तात्काळ पावले उचलता येतात.
- पॅटर्न रेकग्निशन: सोफिस्टिकेटेड मशीन लर्निंग अल्गोरिदम्सचा वापर करून, या प्रिडिक्टिव्ह सिस्टिममध्ये फिशिंग लिंक्स, असामान्य सेंडर डिटेल्स आणि फ्रेजेस यासारख्या इनकमिंग डेटा पॅटर्न्सचा वापर करून, स्पॅम मेसेजेस ओळखता येतात, डिटेक्शन क्षमता वाढवल्या जातात.
- स्पॅम टॅगिंग: स्पॅम म्हणून ओळखले गेलेले मेसेजेस ‘सस्पेक्टेड स्पॅम’ म्हणून टॅग केले जातील, युजर्सना तात्काळ इशारा मिळेल आणि त्यांना त्यांच्या कम्युनिकेशन्सच्या बाबतीत जाणकार निर्णय घेता येतील. या इंटेलिजंट दृष्टिकोनामुळे सुरक्षा वाढते, इतकेच नव्हे तर, अस्सल, खरी कम्युनिकेशन्स अनावश्यक मेसेजेसच्या गर्दीमध्ये हरवली जाणार नाहीत.
- सातत्यपूर्ण सुधारणा: मशीन लर्निंगमार्फत नवीन स्पॅम ट्रेंड्सना अनुकूलित करून सातत्यपूर्ण सुधारणा केल्या जातील, अचूकता आणि प्रभाव यामध्ये सुधारणा घडवून आणल्या जातील. याचा अर्थ असा की, स्पॅम्सचे नवीन प्रकार ओळखून, नवीन धोक्यांपासून युजर्सचे संरक्षण केले जाईल.
ग्राहकांसाठी लाभ:
१. वाढीव सुरक्षा: संभाव्य धोकादायक स्पॅमना फ्लॅगिंग करून ही सेवा ग्राहकांना संभाव्य स्पॅम मेसेजेसची माहिती पुरवते, त्यांना संभाव्य फिशिंग आणि स्कॅम प्रयत्नांपासून सुरक्षित ठेवेल.
२. अखंडित इंटिग्रेशन: ही सेवा ऑटोमॅटिक आहे आणि त्यासाठी सेटअप, ऍप इन्स्टॉलेशनची आवश्यकता नसते, ग्राहकांना काहीही शुल्क भरावे लागणार नाही.