रजत वर्मा मार्च २०२५ पासून डीबीएस बँक इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून धुरा सांभाळणार

सध्‍या, वर्मा डीबीएस बँक इंडियामध्‍ये इन्स्टिट्यूशनल बँकिंग ग्रुपचे प्रमुख आहेत, जे आगामी फेब्रुवारीमध्‍ये निवृत्ती घेणाऱ्या सुरोजित शोम यांच्‍या जागी पदभार स्‍वीकारतील

डीबीएसने आज घोषणा केली की, ते भारतीय रिझर्व्‍ह बँकेने दिलेल्‍या मान्‍यतेनुसार १ मार्च २०२५ पासून डीबीएस बँक इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्‍हणून रजत वर्मा यांची नियुक्‍ती करणार आहे. सध्‍या, वर्मा डीबीएस बँक इंडियामध्‍ये इन्स्टिट्यूशनल बँकिंग ग्रुप (आयबीजी)चे प्रमुख आहेत, जे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी निवृत्ती घेणारे विद्यमान सीईओ सुरोजित शोम यांच्‍या जागी पदभार स्‍वीकारतील. या नवीन पदामध्‍ये, वर्मा डीबीएसच्‍या ग्रुप मॅनेजमेंट कमिटीचे भाग होतील.

२०१५ मध्‍ये डीबीएस बँक इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती झाल्‍यापासून शोम यांनी भारतातील फ्रँचायझीचा मोठ्या प्रमाणात विस्‍तार केला आहे, जसे २०१६ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेली भारतातील पहिली मोबाइल-ओन्‍ली बँक ‘डिजिबँक’. त्‍यांनी २०१९ मध्‍ये भारतातील डीबीएसच्‍या उपकंपन्‍यांचे आणि २०२० मध्‍ये लक्ष्‍मी विलास बँकेच्‍या विलीनीकरणाचे देखील नेतृत्‍व केले. आज, डीबीएस बँक इंडिया १९ राज्‍यांमधील ३५० हून अधिक ठिकाणी कार्यरत आहे आणि २०२० ते २०२२ पर्यंत फोर्ब्‍सच्‍या वर्ल्‍डस् बेस्‍ट बँक्‍स इन इंडिया यादीमधील टॉप तीन बँकांमध्‍ये सामील होती.

अनुभवी बँकर वर्मा यांचा ग्राहक व कॉर्पोरेट बँकिंग, तसेच व्‍यवहारात्‍मक बँकिंग, आर्थिक संस्‍था, शाश्‍वत फायनान्‍स, मायक्रो व एसएमई बँकिंग व शाखा बँकिंगमध्‍ये २७ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

जून २०२३ मध्‍ये आयबीजीचे प्रमुख म्‍हणून डीबीएसमध्‍ये सामील झाल्‍यापासून त्‍यांनी सर्व क्‍लायण्‍ट विभागांमधील व्‍यवसायामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. विद्यमान कॉर्पोरेट संबंध अधिक दृढ करत, नवीन ग्राहक संपादनाला गती देत आणि विकासक्षेत्रांच्‍या व्‍यापक स्‍पेक्‍ट्रममध्‍ये नवीन संधींना ओळखत हे यश संपादित करण्‍यात आले आहे.

त्‍यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत डीबीएसला २०२४ मध्‍ये ग्‍लोबल फायनान्‍सकडून बेस्‍ट बँक फॉर सस्‍टेनेबल फायनान्‍स – इंडिया म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले. डीबीएसमध्‍ये सामील होण्‍यापूर्वी ते एचएसबीसी इंडियामध्‍ये कमर्शियल बँकिंगचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व कंट्री हेड होते.

डीबीएसचे मुख्‍य कार्यकारी अधिकरी पियुष गुप्‍ता म्‍हणाले, ”भारत गेल्‍या ३० वर्षांपासून डीबीएससाठी प्रमुख बाजारपेठ राहिली आहे आणि सुरोजित यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत गेल्‍या दशकाहून अधिक काळामध्‍ये डीबीएस इंडियाने संस्‍थात्‍मक बँकिंग, संपत्ती व रिटेल विभागांमध्‍ये पूर्ण-सेवा देणारा प्‍लॅटफॉर्म म्‍हणून मोठी प्रगती केली आहे. आम्‍ही सुरोजित यांचे डीबीएस इंडियाला आज प्रबळ फ्रँचायझी बनवण्‍यामधील सर्वोत्तमतेप्रती त्‍यांचा दृढ दृष्टिकोन आणि अविरत कटिबद्धतेसाठी आभार व्‍यक्‍त करतो.

बँकिंग दिग्‍गज रजत यांनी १८ महिन्‍यांपूर्वी आमच्‍यामध्‍ये सामील झाल्‍यापासून आमच्‍या इंडिया आयबीजी व्‍यवसायाला अधिक दृढ केले आहे. आमच्‍या प्रबळ प्‍लॅटफॉर्मसह डीबीएस आगामी वर्षांमध्‍ये भारतातील विकासगाथेप्रती योगदान देत राहण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे. मला विश्‍वास आहे की, रजत आतापर्यंत मिळालेल्‍या यशाला अधिक दृढ करतील आणि व्‍यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जातील.”