जे.एस.डब्ल्यू. डिफेन्स एण्ड शिल्ड ए.आय. फॉर्स स्ट्रॅटेजिकचा पुढाकार आगामी दोन वर्षांत ९० लक्ष डॉलरची गुंतवणूक करणार
यु.एस. संरक्षण तंत्रज्ञानावर आधारित सैन्यदलातील विमानांची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जे.एस.डब्ल्यू. डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज शिल्ड ए.आय. कंपनीसोबत नवी भागीदारी जाहीर केली. जे.एस.डब्ल्यू. डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जेएसडब्ल्यू ग्रुप एण्ड शिल्ड ए.आय. आय.एन.सी. कंपनीची निर्मिती आहे. जे.एस. डब्ल्यू. डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि शिल्ड ए.आय.च्या भागीदारीच्यानिमित्ताने देशात आता जमिनीवरुन थेट उभ्या दिशेने उड्डाण करणा-या ‘व्ही बॅट’ या ड्रॉनची निर्मिती केली जाईल.
भारतीय हवाईदलात ‘व्ही बॅट’ ग्रुप ३ अनमॅन्ड एरियल सिस्टीम (युएएस) ड्रोनच्या आगमनाने अत्याधुनिक साधनांची कमतरता पूर्ण होईल. शिवाय जगभरात नावाजलेली युएएस तंत्रज्ञान आता भारतीय हवाईदलात वापरले जात असल्याने सुरक्षायंत्रणेच्या बळकटीकरणास मदत होईल, असा विश्वास जे.एस.डब्ल्यू. डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून व्यक्त करण्यात आला.
‘व्ही बॅट ग्रुप ३ अनमॅन्ड एरियल सिस्टीम’च्या निर्मितीसाठी येत्या दोन वर्षांत तब्बल ९० लक्ष डॉलरची गुंतवणूक केली जाईल. वर्षभराच्या कालावधीत या उड्डाणांच्या निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी ६५ लाखांची गुंतवणूक होईल. याकरिता खास नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन आखले जाईल. उड्डाणाच्या निर्मितीकरिता आवश्यक परवाना मिळवणे, मनुष्यबळ तयार करणे, कर्मचा-यांना पुरेसे प्रशिक्षण देणे हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन उभारले जाईल. ड्रोनच्या उड्डाणासाठी आवश्यक यंत्रणेची उभारणीही देशातच होईल. ड्रोन उड्डाणाच्या चाचण्याही घेतल्या जातील.
‘व्ही बॅट’ या उड्डाणाची रचना हेच मूळात ड्रोनच्या रचनेचे खास वैशिष्ट्य समजले जाते. इतर लढाऊ किंवा प्रवासी विमानांप्रमाणे ते जमिनीवरुन तिरप्या दिशेने उड्डाण करत नाहीत. ‘व्ही बॅट’ जमिनीवरुन थेट उभ्या दिशेने आकाशात उड्डाण करते. थेट उड्डाणाकरिता ड्रॉनवर दोन्ही बाजूंनी पंख बसवण्यात आले आहे. उभ्या दिशेनेच ‘व्ही बॅट’ जमिनीवर पुनरागमन करते. उंच आकाशावरुन जमिनीवर घडणा-या घडामोडींचा वेध घेणे, संशयास्पद तसेच आवश्यक हालचालींची नोंद घेणे, त्याचे छायाचित्र टिपणे ही कामे करण्यासाठी ‘व्ही बॅट ड्रोन’ची मदत घेतली जाईल.
आकाशातून संशयास्पद भूभागाची टेहाळणी करण्यासाठी व्ही बॅट ड्रोन जगभरातील विविध देशांत वापरले जात आहे. उंच अंतरावरुनही जमीनीवरील हाचलाही या ड्रोनच्या मदतीने सहज टिपता येतात. युएस नौदलातही या ड्रोनचा वापर करुन समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवला जातो. ज्या भूभागावर माणसाला पाय ठेवणेही कठीण आहे, अशा ठिकाणांवर गस्त ठेवण्यासाठी या ड्रोनची तत्परतेने मदत घेतली जाईल. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सैन्यदलातील विशेष पथके, पायदळ तसेच तोफखान्यांच्या वापरासाठी नियुक्त पथकांकडून या ड्रोनचा वापर फायदेशीर ठरेल. व्ही बॅटच्या मदतीने साधनसामग्रीही जलदरित्या पोहोचवली जाईल, अशी व्यवस्था ड्रोनच्या रचनेत उभारली आहे.
व्ही बॅट निर्मितीबाबत जेएसडब्ल्यू ग्रुपचे पार्थ जिंदाल यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, ‘’ आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती असलेली उपकरणे पुरवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशाखातर आम्ही शिल्ड ए.आय.सोबत तंत्रज्ञान आणि आवश्यक सोयीसुविधांनीयुक्त उपकरणांच्या निर्मितीसाठी भागीदारी करत असल्याचे जाहीर करत आहोत. या भागीदारीतून आपल्या भारतीय सैन्यदलाकडे सर्व आवश्यक यंत्रणांचा समावेश असलेली साधनसामग्री पुरवली जाईल.
सैनिकांनी व्ही बॅट हे स्वयंचलित ड्रोन कसे वापरावे, त्याची देखभाल-दुरुस्ती कशी राखावी याबद्दलचे प्रशिक्षणही दिले जाईल. भारतीय संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून निर्माण होणारी साधनसामग्री पुरवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिल्ड ए.आय.सोबतची भागीदारी करुन आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहोत.’’
शिल्ड ए.आय.चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, ‘’ भारतातील संरक्षण व्यवस्थेत योगदान देण्यासाठी शिल्ड ए. आय. कडून नेहमीच सकारात्मकता दर्शविण्यात आली होती. आता या भागीदारीच्या निमित्ताने ही इच्छा प्रत्यक्षात साकारली जाईल. यु. एस. आणि भारत सरकारही संरक्षण क्षेत्रातील विकास साधण्याबाबत एकमेकांशी हातमिळवणी करण्याबद्दल सदैव प्रयत्नशील होते. जे. एस. डब्ल्यू. कंपनीने भारतीय सैन्यदलाला अत्याधुनिक साधनसामग्री पुरवण्याचा वसा घेतला आहे. आमच्या भागीदारीतून भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उभारल्या जातील.’’
शिल्ड ए.आय.चे अध्यक्ष, सहसंस्थापक आणि माजी नौदल सील ब्रॅण्डन टी संग यांनीही या भागीदारीतून देशाला मिळणा-या नव्या अत्याधुनिक ड्रोनचे संरक्षण क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ‘’ जे.एस.डब्ल्यू. ग्रुपच्या माध्यमातून शिल्ड ए.आय.ची होणारी भागीदारी इंडो-युएस भागीदारीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या भागीदारीच्या मदतीने भारत संरक्षण क्षेत्रातील निर्मिती प्रक्रियेत आत्मनिर्भर आणि स्वावलंबी देश म्हणून ओळखला जाईल. शिवाय आम्हांलाही या अत्याधुनिक युएएस तंत्रज्ञान जगभरात पोहोचवता येईल.
२०१६ साली भारत आणि युएसमध्ये संरक्षण क्षेत्रातील विकास साधण्यासाठी साधनसामग्री पुरवण्याविषयी भागीदारी करण्यात आली. शस्त्रबळातील साधनसामग्री आदानप्रदान भागीदारी अधिक वृद्धिगंत व्हावी म्हणून दोन वर्षांनी या भागीदारीला प्रथम दर्जा प्रदान केला गेला. या सुधारित भागीदारीत भारत आणि युएईचा समावेश होता. दोन्ही देशांत शिल्ड ए.आय.ची कार्यालये आहेत. या भागीदारीतून होणा-या आर्थिक गुंतवणूकीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, ‘’ शिल्ड ए.आय.निर्मित उपकरणांचे महत्त्व आणि किफायतशीर किंमतीबाबत जे.एस.डब्ल्यू.ग्रुपने अगोदर माहिती जाणून घेतली. युएएस ग्रुप ३ वर्गवरातील ‘वी व्हॅट’ ड्रोन महागड्या युएएस पाच वर्गवारीतील हेलिकॅप्टर्स आणि विमानांना टक्कर देतो. या वर्गवारीतील हॅलिकॅप्टर्स आणि विमानांच्या तुलनेत या ड्रोनची किंमत रास्त आहे.
संरक्षण क्षेत्रातील बाजापेठेत आता महागड्या उपकरणांची आणि साधनसामग्रींची जागा ए.आय. स्वयंचलित उपकरणांनी घेतली आहे. तेजीने वाढणा-या या मागणीत युएएस वर्गवारीतील विमान खरेदी आता महागडी राहिली नाही. शिल्ड ए.आय. च्या भागीदारीने युएस गुंतवणूक वाढेल. जागतिक बाजारपेठेतील उपकरणांच्या वाढत्या मागणीत यु.एस.चे महत्त्व अधोरेखित होईल.’’