टाटा संपन्न तुमच्यापर्यंत अन्नपदार्थ त्याच्या नैसर्गिक गुणधर्मासह कसे घेऊन येते हे दर्शवणारी मोहीम
नवीन फिल्म येथे पाहा: https://youtu.be/WqIdcN_IffY
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (टीसीपीएल) पॉलिश न केलेल्या डाळी, नैसर्गिक तेल राखलेले मसाले, फायबर असलेले गुर्जरी प्रकारचे पोहे, उच्च दर्जाचा सुका मेवा असे सर्वोत्तम नैसर्गिक गुणांसह विविध उत्पादने सादर करते. ‘प्रेमाने भरलेले’ ही त्यांची नवीनतम ब्रँड मोहीम, या अनोख्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणते आणि ग्राहकांना नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण खाद्य तत्वे निवडण्यास प्रोत्साहित करते.
या जाहिरातीत, शेफ संजीव कपूर आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यातील मैत्रीपूर्ण संवादातून टाटा संपन्न अनपॉलिश्ड डाळ कशी खास आहे हे दाखवले आहे. याचे कारण त्यात आवश्यक पोषक तत्वे आणि नैसर्गिक गुणधर्म कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे, या डाळी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय बनतात.
नैसर्गिक घटकांसह स्वयंपाक करण्याच्या आनंदाचा उत्सव साजरा करत कुटुंबासाठी प्रत्येक जेवण स्वादिष्ट आणि पोषणदायी बनवून ‘प्रेमाने भरलेले’ मोहीम अन्न निसर्गप्रणीत स्वरूपात ग्रहण करण्याच्या कल्पनेला चालना देते. ज्यामुळे ग्राहक आणि त्यांच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये खोल संबंध निर्माण होतो.
मोहीमेबद्दल बोलताना टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पॅकेज्ड फूड्स इंडियाच्या अध्यक्ष दीपिका भान म्हणाल्या, “पॉलिशिंग ही एक कठोर आणि तीव्र प्रक्रिया असून त्यामुळे डाळीतील बहुतेक पोषक तत्वे काढून टाकले जातात हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या डाळी पॉलिश करत नाही. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी निसर्गाच्या प्रेमाने म्हणजेच पोषणमूल्याने भरलेल्या, डाळी सादर करतो. फक्त डाळीच नाही, तर संपन्नच्या सर्व अन्न पदार्थांमध्येही ही गोष्ट काटेकोरपणे सांभाळली जाते.”
याबाबत आपले विचार मांडताना ओगिल्वी इंडिया चे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर (पश्चिम) अनुराग अग्निहोत्री म्हणाले, “जेव्हा अन्नावर प्रक्रिया केली जात नाही, त्यात कोणतीही भेसळ केली जात नाही आणि त्यात काही कृत्रिम किंवा बाह्य पदार्थ नसतात, तेव्हा त्यात काय असते? कदाचित, फक्त प्रेम. टाटा संपन्न आपल्या डाळी पॉलिश करत नाही आणि त्यांच्या शुद्ध मसाल्यांमध्ये नैसर्गिक तेल असते. निसर्गानेच या पदार्थांमध्ये ठेवलेले हे नैसर्गिक प्रेम ते कायम ठेवतात. हीच कल्पना आम्हाला दाखवायची होती. दोन लाडक्या भारतीय शेफच्या माध्यमातून ही कल्पना ऐकली जाईल आणि सर्वांना आवडेल अशी आशा आहे.”
ब्रँडसोबतच्या आपल्या सहयोगाबद्दल बोलताना शेफ संजीव कपूर म्हणाले, “स्वयंपाक करणे ही एक कला आहे. जेवण तेव्हाच खास बनते जेव्हा तुमचे प्रयत्न आणि तत्वेपदार्थ प्रेमाने भरलेले असतात. म्हणूनच मी टाटा संपन्नची निवड करतो. त्यांच्या उत्पादनांमध्ये शुद्ध नैसर्गिक आणि असीम प्रेम आहे. हे पदार्थ वापरुन स्वयंपाक करताना तुम्हाला दरवेळेस हे जाणवते. भारतीय अन्नपदार्थाच्या, निसर्गाच्या, माझ्या, तुमच्या या प्रेमाचा सन्मान करणाऱ्या मोहिमेचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”
ब्रँड मोहिमेबद्दल शेफ रणवीर ब्रार यांनी प्रचंड खुशीने सांगितले, “सर्वात पौष्टिक, स्वादिष्ट अन्न हे जे नैसर्गिक स्वरूपात मिळते ते आहे याची टाटा संपन्न आपल्याला आठवण करून देते. मला विश्वास आहे की चांगले अन्न तयार करण्याचे रहस्य त्याच्या नैसर्गिक स्वरूपाचा आदर करण्यात आहे आणि मला आनंद आहे की मी अशा मोहिमेचा एक भाग आहे. नैसर्गिक स्वरूपाचा हा विचार यामध्ये सुंदरपणे मांडलेला आहे. टाटा संपन्नची नैसर्गिक स्वरूपाच्या जवळ असलेली उत्पादने खरोखर घरगुती जेवणाचा आनंद वाढवू शकतात.”
टाटा संपन्नची ‘प्रेमाने भरलेले’ मोहीम सोशल मीडियासह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर केली जाईल. ग्राहक या उपक्रमात सहभागी होऊन त्यांचे टाटा संपन्न उत्पादनांसोबतचे स्वयंपाकाचे अनुभव शेअर करू शकतील. निसर्गाचे प्रेम आपल्या रोजच्या स्वयंपाकाला पोषणदायी आणि स्वादिष्ट बनवते हे ग्राहकांना या फिल्ममधून दाखवले जात आहे. सादर करण्यात आलेली नवीन फिल्म टाटा संपन्नच्या सोशल मीडियावर लाईव्ह बघता येऊ शकेल.