आमदारांनी कारखाना बंद पाडला – सुधीर फराटे

शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा दोन्ही बाजूने धडाडत असताना अचानकच ज्या घोडगंगा कारखान्या भोवती शिरूरचे राजकारण फिरत होते या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुलीत पाणी कारखाना व्यवस्थापकांनी ओतले होते.

एवढे दिवस पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कामगारांना घरी बसवण्यात आले आता कामगारांना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखाना प्रशासनाने मागील व आत्ताचा पगार देऊ तुम्ही कामावर या अशी विनंती करण्यास सुरुवात केलेली आहे .या गोष्टीचा कितपत परिणाम आता निवडणुकीवर होतोय हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

विद्यमान आमदार यांनी अनेक वेळा सांगितले की अजित दादा पवार यांनी या कारखान्यांना कर्ज मिळवून दिले नाही परंतु सुधीर फराटे यांनी सांगितले की हायकोर्टात एमसीडीसी कर्ज प्रकरणाच्या बाबतीत कारखान्याचा विषय मांडण्यासाठी कारखान्याचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. आजपर्यंत एकूण पाच तारखा हायकोर्टात झालेल्या आहेत मग जर कारखाना प्रशासनाला कारखान्याची व तेथील कामगारांची काळजीच असती तर त्यांनी उपस्थिती दर्शवली असती.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या गेली २५ वर्ष ताब्यात असूनही कारखान्याच्या अपयशाचे खापर विद्यमान आमदार अजित दादांवर फोडत आहेत एकहाती कारभार असूनही ज्यांना घोडगंगा कारखान्याचे कामकाज नीट चालवता आले नाही.
परंतु आता त्यांच्याच कर्तबगारिने कारखाना बंद पडला आहे.