अग्रगण्य ब्रोकरेज कंपन्या सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) संदर्भात उत्साहीत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीच्या सिग्नेचर ग्लोबलच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा झाल्यानंतर आयसीआयसीआय सेक्युरिटीज आणि मोतिलाल ओसवाल यांनी सिग्नेचर ग्लोबलच्या समभागांसाठी (शेअर) खरेदी (बाय) रेटिंग जारी केली आहे.
आयसीआयसीआय सेक्युरिटीजने खरेदी हेच मानांकन कायम ठेवत २,००७ रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे, तर मोतिलाल ओसवालने प्रति समभाग २,००० रुपयांची किंमत दिली आहे. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी कामकाज संपताना कंपनीच्या समभागांची किंमत ३.४१ टक्क्यांनी वाढून प्रति समभाग १२९८.०५ रुपयांवर पोहोचली. कंपनीचे एकूण बाजार भांडवल १८,२३८ .९९ कोटी रुपये आहे.
ब्रोकरेज कंपन्यांच्या शिफारसी
मोतिलाल ओसवाल या कंपनीने आपली खरेदी (बाय) रेटिंग कायम ठेवून प्रति समभाग २,००० रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे, म्हणजेच ५६ टक्के वाढीची क्षमता सूचित केली आहे. सिग्नेचर ग्लोबलने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २७.८ अब्ज रुपयांची पूर्व-विक्री नोंदविली असून त्यात वार्षिक १८३ टक्के वाढ झाली आहे.
त्याला आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत टायटॅनियम एसपीआर (समूह गृहबांधणी) आणि डॅक्सिन व्हिस्टाज (टाऊनशिप प्रकल्प) यांच्या आरंभाने उभारी मिळाली आहे. मोतिलाल ओसवाल कंपनीने सिग्नेचर ग्लोबलच्या या जोरदार कामगिरीची नोंद घेतली आहे.त्याच प्रमाणे आयसीआयसीआय सेक्युरिटीजने २,००७ रुपयांची सुधारित लक्ष्य किंमत देऊन बाय रेटिंग कायम ठेवली आहे.
या ब्रोकरेज कंपनीने नोंदविले आहे, की आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत विकसकाने मुख्यतः परवडणाऱ्या आणि मध्य-उत्पन्न गृहबांधणी प्रकल्पांच्या माध्यमातून ६३ टक्के एकत्रित वार्षिक वृद्धिदरासह (सीएजीआर) विक्री बुकिंग साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत विकसकाने सेक्टर ७९ , गुरुग्राम येथील टायटॅनियम प्रकल्प आणि सोहना, गुरुग्राम येथील डॅक्सिन व्हिस्टाज या प्रकल्पांच्या आरंभाची चालना मिळून ५९ अब्ज रुपयांच्या विक्री बुकिंगची नोंद केली आहे.
“आर्थिक वर्ष २०२४ – २०२८ मध्ये ४५० अब्ज रुपयांच्या एकत्रित ढोबळ विकास मूल्यासह (जीडीव्ही) प्रकल्पांच्या आरंभाची दमदार रांग असल्यामुळे, आर्थिक वर्ष २०२४ – २०२७ च्या शेवटादरम्यान २१ टक्के एकत्रित वार्षिक वृद्धिदराच्या (सीएजीआर) विक्री नोंदणीचे अनुमान आम्ही बांधत आहोत, आर्थिक वर्ष २०२५-२०२७ च्या शेवटादरम्यान ती वार्षिक ११०-१३० अब्ज रुपये दरम्यान राहील. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीच्या दमदार निकालांचा विचार करता, आर्थिक वर्ष २०२५ शेवटादरम्यान विक्री नोंदणी ७ टक्काने वाढवून प्रत्येकी १०८ अब्ज रुपये आणि ११४ अब्ज रुपयांपर्यंत आम्ही वाढवत आहोत,,” असे कंपनीने पुढे म्हटले आहे.
दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात उसळी
सिग्नेचर ग्लोबलने सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १९.९२ कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत एकंदर ४.१७ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीतील १२१.१६ कोटी रुपयांवरून ७७७.४२ कोटी रुपये एवढे वाढले.
आर्थिक वर्ष २०२५च्या दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्नासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) कंपनीचे अध्यक्ष श्री. प्रदीप अगरवाल म्हणाले, दिल्ली-एनसीआर प्रदेशातील, विशेषतः गुरुग्राममध्ये, रिअल इस्टेट बाजारपेठेत ठोस मूलभूत तत्त्वे दिसून येत आहेत. ग्राहकांची चिवट मागणी, बाजारपेठेतील सकारात्मक वातावरण आणि लक्षणीय मूलभूत सोईसुविधांची वाढ यांचा त्यांना आधार मिळत आहे. गुरुग्राममध्ये आमच्या अलीकडील लॉन्चला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे विचारपूर्वक नियोजन केलेल्या समुदायांमधील दर्जेदार घरांची वाढती मागणी अधोरेखित होते.
भविष्यात आम्ही कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्यावर, आमचा आर्थिक पाया मजबूत करण्यावर आणि सर्व भागधारकांसाठी शाश्वत मूल्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. गुरुग्रामच्या विस्तारित पायाभूत सुविधा आणि एनसीआरमध्ये सुरू असलेले शहरीकरण यांमुळे, आम्ही शिस्तबद्ध आर्थिक दृष्टीकोन राखून प्रस्थापित विकासकांसाठी वाढत असलेल्या गृहनिर्माण गरजा पूर्ण करण्यासाठी आशादायक संधींची आम्हाला अपेक्षा आहे.