टीव्हीएस मोटर कंपनी या आघाडीच्या आणि दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपनीने टीव्हीएस रॉनिन ड्रिफ्ट आर स्कूल सादर केली आहे. या गाडीच्या निमित्ताने मोटरसायकल प्रेमींना फ्लॅट ट्रॅक रेसिंगचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम टीव्हीएस रॉनिनच्या रायडिंगचा अनोखा अनुभव देत ब्रँडचे ‘अनस्क्रिप्टेड’ तत्व जपण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे.
सहभागींना स्लायडिंद आणि कॉर्नरिंगसारखी फ्लॅट ट्रॅकवरील महत्त्वाची तंत्रे खास तयार करण्यात आलेल्या रॉनिन फ्लॅट ट्रॅकर्सवर शिकता येणार असून त्यासाठी टीव्हीएस अथलीट ऐश्वर्या पिसे आणि निलेश धुमाळ खास मार्गदर्शन करतील. हा प्रोग्रॅम प्रात्यक्षिक अनुभव देणारा असल्यामुळे रायडर्सना ट्रॅकवर सुरक्षित व नियंत्रित वातावरणात आवश्यक अनुभव मिळतो. कौशल्ये उंचावण्याबरोबरच रॉनिन ड्रिफ्ट आर स्कूल मोटरसायकलिंग व साहसाविषयी पॅशन वाटणाऱ्या रायडर्सना एकत्र आणणारा आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम व्यवसायाचे प्रमुख विमल सुंबली म्हणाले, ‘टीव्हीएस रॉनिन ड्रिफ्ट आर स्कूल ही रायडर्सना सिग्नेचर रॉनिन ट्विस्टसह फ्लॅट ट्रॅक रेसिंग अनुभवण्याची संधी देणारी आहे. या गाडीमध्ये आधुनिक रेट्रो डिझाइन आमच्या ब्रँडची वैशिष्ट्ये यांचा मेळ घालण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ रायडिंग तंत्रे शिकवण्यापुरता मर्यादित नाही, तर इथे रायडर्सना त्यांच्या पॅशनचा खऱ्या अर्थाने इथे शोध घेता येईल, आपली कौशल्ये उंचावता येतील आणि या क्रीडाप्रकाराबद्दल वाटणारे प्रेम इतरांशी शेयर करता येईल.’
रॉनिन ड्रिफ्ट आर स्कूल टीव्हीएस रॉनिनच्या तत्वांना नवा आयाम देणारे आहे. यामुळे रायडर्सना फ्लॅट ट्रॅक रेसिंगचा आनंद घेता येईल तसेच नव्या युगातील रायडर्स कम्युनिटीशी कनेक्ट होता येईल. टीव्हीएस रॉनिन आधुनिक तंत्रज्ञान व रेट्रो रूप यांसाठी प्रसिद्ध असून ती केवळ एक मोटरसायकल नाही. ही वैविध्यपूर्ण बाइक #Unscripted मार्ग शोधण्यासाठी, मनात येईल ते पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारा मोटरसायकलिंगचा अनुभव देणारी आहे.